कोपरगाव तालुका
कोपरगावात बंदिस्त नाट्यगृहाच्या भूमीपूजनाचे नाटक रंगले !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात आज मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुल्या नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले मात्र त्याची कल्पना ना मुख्याधिकारी यांना होती ना नगरसेवक ना पत्रकार यांना होती हा कार्यक्रम नाट्य कलाकारांच्या हस्ते करण्याचे जाहीर करूनही त्यांच्या साधे एक गुलाबाचे फुल वा सत्कार आला नाही मात्र उपेक्षाच आली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे हे काम आगामी नगरपरिषदेची निवडून डोळ्यासमोर ठेऊन केले की काय ? असा सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे हा नूतनिकरणाचा नारळ खरा की केवळ नाटकबाजी आहे असा सवाल आगामी काही दिवसात संपन्न होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निर्माण झाला आहे.
नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिद्धीस दिलेले छायाचित्र
“आम्हाला निमंत्रण देताना तुमच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे असे बजावले होते.या खेरीज कोणाही राजकीय नेत्याला बोलावले जाणार नाही असे सांगून तोंडाला पाने पुसली आहे.आम्हाला ना एखादी गुलाबाची पाकळी वाट्याला आली ना गुलाबाचे फुल.एवढे कशाला आम्ही राज्यपातळीवर काम केलेले असताना आमचा साधा नामोल्लेख त्या कार्यक्रमात टाळला गेला आहे.हा आमचा सन्मान हि अपमान हेच आम्हाला कळेनासे झाले” यावर नंतर दूरध्वनी करून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सारवासारव केली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे”
आ.आशुतोष काळे यांनी प्रसिद्धीस दिलेले छायाचित्र
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक आगामी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.त्या साठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.येत्या १६ डिसेंबर रोजी पदाधिकारी व नगरसेवकांचा कालावधी संपत आहे.त्यामुळे उदघाटने व कामे मंजुरीचा सपाटा सुरु झाला आहे.कोपरगाव शहरात विविध रस्त्यांच्या २८ कामासह खुल्या नाट्यगृहाच्या नूतनिकरणाचा प्रश्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या न्यायिक कचाट्यात अडकवला होता.त्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल असे वाटत नसताना भाजपचे माजी आ.स्नेहलता कोल्हे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे एकाएकी गुळपीठ झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.त्या मुळे हि कामे निकाली निघतील अशी अपेक्षा असताना मात्र या कामाचे ‘काळहरण’ करण्याची किमया मात्र वर्तमान भाजप सत्ताधाऱ्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत साध्य केली होती.त्यामुळे पालिकेच्या हाती फार काही साध्य होण्याची शक्यता नव्हतीच.तरीही हे लोटांगण घातले गेले त्या बाबत शहरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना हि घटना उघड झाली आहे.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,सिनेअभिनेते चंद्रकांत शिंदे,पृथ्वीदेवी बिरारी,भरत मोरे,डॉ.मयूर तिरमखे,संतोष तांदळे,ऍड.मनोज कडू,कोपरगाव नगरपरिषदेचे विरोधी पक्षाचे गटनेते विरेन बोरावके,अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद,प्रतिभा शिलेदार,माधवी वाकचौरे,मंदार पहाडे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,रविकिरण डाके,राजेंद्र शिंदे,गांधी प्रदर्शन ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,शैलेश शिंदे,गणेश सपकाळ,केतन कुलकर्णी,विकास किर्लोस्कर,श्री वीरकर,डॉ.किरण लद्दे,सुनील शिलेदार,कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात केवळ नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याना निमंत्रित करण्यात आले असल्याचे सत्ताधारी गटाकडून बजावले होते.मात्र तेथे वस्तुस्थिती मात्र वेगळीच आढळून आल्याने त्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या.व कार्यक्रमाचे भूमिपूजन हे प्रा.सौ बिरारी यांच्या करण्यात करण्यात आले असले तरी ती केवळ औपचारिकता ठरली असून आ.काळे यांच्या संपर्क कार्यालयाकडून मात्र याच्या विपरीत बातम्या प्रसूत करण्यात आल्या असून आ.काळे यांनीच हे भूमिपूजन केले असल्याचे सांगितले आहे हे विशेष !
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने काही मान्यवर कलावंतांना याबाबत संपर्क करुन बोलते केले असता त्यांनी,”आम्हाला निमंत्रण देताना तुमच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे असे बजावले होते.या खेरीज कोणाही राजकीय नेत्याला बोलावले जाणार नाही असे सांगून तोंडाला पाने पुसली आहे.आम्हाला ना एखादे गुलाबाची पाकळी वाट्याला आली ना गुलाबाचे फुल.एवढे कशाला आम्ही राज्यपातळीवर काम केलेले असताना आमचा साधा नामोल्लेख त्या कार्यक्रमात टाळला गेला आहे.हा आमचा सन्मान हि अपमान हेच आम्हाला कळेनासे झाले” यावर नंतर दूरध्वनी करून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सारवासारव केली असल्याची प्रतिक्रिया बोलकी मानली पाहिजे.त्याला अनेक कलाकारांनी दुजोरा दिला आहे.
या शिवाय ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याशी संबाधित खुल्या नाट्यगृहाचा ‘जो’ नूतनिकरणाचा कार्यक्रम घेतला त्या दलित संघटनांना निमंत्रण देण्याचे औचित्य दाखवले गेले नाही.त्यामुळे त्यांच्यातही नाराजी दिसून आली आहे.या कार्यक्रमाचे भूमिपूजन आ.काळे यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने तो आ.काळे यांच्या हस्ते झाल्याचे तर नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तो नाट्यकलावंत प्रा.सौ.बिरारी यांच्या हस्ते झाल्याचे सांगितले दिसून आले आहे.व हि विसंगती कोणाला फायदेशीर व कोणाला आतबट्याची ठरणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने विरोधी पक्षाचे गटनेते विरेन बोरावके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आ.आशुतोष काळे यांना निमंत्रण होते की नाही हे त्यांना स्पष्ट सांगता आले नाही.व त्यांना अध्यक्षांनी निमंत्रण दिले असेल असे मोघम उत्तर देऊन मात्र नगरपरिषदेच्या एका सामाजिक संकेतस्थळावर असलेल्या संदेशावरून आपण आलो असल्याचे सांगून निमंत्रण नसल्याच्या घटनेला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.त्याला नगरसेवक मंदार पहाडे,अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनीही तोच कित्ता गिरवला आहे.व एकही प्रशासकीय अधिकारी नसल्याच्या घटनेला मात्र सगळ्यानीच दुजोरा दिला आहे.
पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी,”आपल्याला या कार्यक्रमाबाबत विचारणा झाली होती मात्र आपण या कार्यक्रमास उपस्थित रहाणार नाही” असे सांगितले होते.त्यामुळे उपस्थित राहण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले आहे.व कोण उपस्थित होते कोण नव्हते याबाबत ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे हा कार्यक्रम कोणी केला ? का केला ? याचे उत्तर कोणाकडेही दिसून आले नाही.हे काम कोणी घेतले आहे.याबाबतही कोणालाही काही सांगता आले नाही हे विशेष ! या बाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.मात्र त्यांनी हि नाराजी त्यांच्या व्यवस्थे कडे व्यक्त केल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
मात्र याला एक माणूस अपवाद होता ते म्हणजे आरेखक रविकिरण डाके यांनी मात्र,”या कामाच्या भूमीपूजनास आपण हजर होतो असते सांगून याचे अंदाजपत्रकीय रक्कम हि,”सन-२०१९ च्या दराप्रमाणे असून ती ८३ लक्ष रुपये आहे.त्यात जी.एस.टी.सह ते ९९ लाखांपर्यंत आहे त्यात या नाट्यगृहाचे वरील छत दुरुस्त करणे,प्रेक्षक बसण्याच्या पायऱ्यांचे,समोरील वरच्या दर्शनी बाजूंची दुरुस्ती करणे,खालील फरशी बदलवणे,स्वच्छता गृहाचे नूतनीकरण व पाण्याचाही व्यवस्था करणे,रंगाचे नूतनीकरण करणे आदींचा समावेश” असल्याचे सांगितले आहे.मात्र त्यांना काम पूर्ण करण्याचा कालावधी सांगता आला नाही.तो प्रशासकीय मुद्दा असल्याचे विश्लेक्षण त्यांनी दिले आहे.