जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बस आगारात व्यापारी संकुल उभारण्यास मान्यता द्या – आ. काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव बस आगाराच्या मोकळ्या जागेवर शहरातील बेरोजगारांच्या हितासाठी व्यापारी संकुल उभारण्यास मान्यता द्यावी अशी मागणी कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे नुकतीच एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोपरगाव बस स्थानकाचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. या बस स्थानकाशेजारी यापूर्वी अनेक लहान मोठे व्यावसायिक आपले व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केल्याने हे व्यावसायिक पराधीन झाले.परंतु नूतन बस स्थानकाच्या नियोजित इमारतीमध्ये व्यावसायिकांसाठी गाळ्यांचे नियोजन करण्यात आलेले नाही. कोपरगाव शहरातील विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.

कोपरगाव मतदार संघाशेजारीच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिर्डी देवस्थानसह अनेक धार्मिक स्थळे असल्यामुळे कोपरगाव बसस्थानकावर इतर जिल्हा व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी येत-जात असतात. हे बसस्थानक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दिवसभरात येथे हजारो प्रवाशांची व शेकडो बसची वर्दळ असते. मात्र या प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा मिळत नाही. कोपरगाव बस स्थानकाचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. या बस स्थानकाशेजारी यापूर्वी अनेक लहान मोठे व्यावसायिक आपले व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केल्याने हे व्यावसायिक पराधीन झाले.परंतु नूतन बस स्थानकाच्या नियोजित इमारतीमध्ये व्यावसायिकांसाठी गाळ्यांचे नियोजन करण्यात आलेले नाही. कोपरगाव शहरातील विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या व्यावसायिकांवर त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे.कोपरगाव शहराची वाढत असलेली लोकसंख्या व बाजारपेठेचा प्रश्न सुटावा यासाठी नूतन बस स्थानकात व्यापारी संकुल होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील संगमनेर येथे झालेल्या बस स्थानकाच्या सर्व बाजूंनी मोठे व्यापारी संकुल बांधण्यात आलेले आहे. अशाच प्रकारे कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारावे त्यामुळे कोपरगाव शहरातील विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्यासाठी कोपरगाव बस आगाराच्या मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी मान्यता द्यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी परिवहन मंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडे शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close