जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समुद्राला वाहून जाणारे ८० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा- आ.आशुतोष काळें

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी खोरे हे तुटीचे असून या भागातील शेतकऱ्यांची शेती सिंचनाच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी पश्चिम घाटमाथ्यावरील अरबी समुद्राला वाहून जाणारे ८० टी. एम.सी.पाणी पूर्वेस वळविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा व नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा हा प्रादेशिक पाण्याचा वाद निकाली काढावा अशी मागणी कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली आहे.

शासनाचे २००१ च्या अहवालानुसार पश्चिमेला अरबी समुद्राला वाहून जाणारे जवळपास ८० टीएमसी पाणी पूर्वेकडील अतीतुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवावे यासाठी माजी आ. अशोक काळे यांनी २०१३ साली उच्च न्यायालय मुंबई येथे याचीका दाखल केलेली होती. या याचिकेचा दिनांक २३ सप्टेंबर २०१६ रोजी निर्णय होवून पावसाळ्यात पश्चिमेचे अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी शासनाने मुदतीत कार्यवाही करून पूर्वेकडील खोऱ्यात असा आदेश उच्च न्यायालयाने २०१६ ला विद्यमान शासनाला केलेला आहे. त्यावर तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित आहे

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना गोदावरी कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी बारमाही पाणी मिळत होते. बारमाही पाणी मिळत असल्यामुळे लँड सिलींग कायद्यान्वये बारमाही बागायती जमिनी गृहीत धरून शेतकऱ्यांच्या जास्तीच्या जमिनी काढून घेण्यात आल्या. त्यानंतर ब्लॉकधारक शेतकऱ्यांचे ५० टक्के ब्लॉक्स देखील रद्द करण्यात आले व आता समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यान्वये गोदावरी कालव्यांच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे पाण्याच्या बाबतीत नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा प्रादेशिक वाद निर्माण झालेला आहे. त्यासाठी पावसाळ्यात पश्चिमेला अरबी समुद्राला वाहून जाणारे जवळपास ८० टीएमसी पाणी पूर्वेकडील अतीतुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी निधी देवून कायमस्वरूपी नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा प्रादेशिक वाद मिटवावा.

अधिवेशनात आ. काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना गोदावरी कालव्यातून सिंचनासाठी पाणी दिले जाते. या कालव्यांना १०७ वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे या कालव्यांची वहनक्षमता कमी झालेली आहे त्यामुळे सिंचनासाठी मिळणारे आवर्तनही पूर्ण क्षमतेने मिळत नाही. मात्र समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याचा आधार घेत नगर नाशिक च्या धरणातून पिण्याच्या नावाखाली जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते. यामुळे पर्जन्यछायेखालील व कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. बारमाही ब्लॉकच्या नावाखाली लँड सिलींग कायद्यान्वये जास्तीच्या जमिनी गेल्या व आता ५० टक्के ब्लॉक्स रद्द केल्यामुळे दुहेरी अन्याय झाला असल्याचा लाभधारक शेतकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आ. आशुतोष काळे यांनी पहिल्याच अधिवेशनात शेती सिंचनाच्या महत्वाच्या पाण्याच्या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधून घेत निधीची मागणी केली आहे. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेमध्ये व गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close