जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात अपर्णाताई तीर्थंकर यांचे गुरुवारी व्याख्यान

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव समता चॅरिटेबल ट्रस्ट ,निवारा मित्रमंडळ ट्रस्ट संचलित श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रसिद्ध समाजसेविका अड्.अपर्णाताई रामतीर्थकर यांचे “आयुष्याची संध्याकाळ सुंदर जगू या” या विषयावर गुरुवार दि.१९ डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास आयोजित केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील अखिल भारतीय जेष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा प्रा.उषा साळुंके, कोपरगाव जेष्ठ नागरीक मंचचे अध्यक्ष छोटुभाई जोबनपुत्रा, राजश्री शाहू महाराज जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मनसाराम पाटील आदी प्रमुख उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विष्णुपंत गायकवाड,सुरेंद्र व्यास, श्रीमती पुष्पलता सुतार आदींनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close