जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सातभाई मर्चंट बँकेत बेकायदा ठेवी ठेवल्या,आरोपींची निर्दोष मुक्तता

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव परिसर व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रमोहन हरबन्सलाल पापडेजा व त्याच्या संचालक मंडळातील १९ संचालक आदींनी आपल्या संस्थेच्या ठेवी कोपरगाव शहरातील बाळासाहेब सातभाई मर्चंट को-ओपरेटिव्ह बँकेत बेकायदा ठेवल्याचा आरोप लेखापरीक्षक किशोर कुलथे यांनी ठेऊन त्याच्या विरुध्द कारवाईची मागणी केली होती ती वरिष्ठ दिवाणी न्यायालय क्रं.३ यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून फेटाळली आहे व अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक आदी १९ आरोपीना निर्दोष सोडले असल्याची माहिती अड्.दिलीप लासुरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव शहरातील बाळासाहेब सातभाई कॉ-ओपरेटिव्ह बँक हि डबघाईस आली त्यात अनेक ठेवीदार व सहकारी संस्थांच्या ठेवी अडकल्या होत्या त्यात कोपरगाव परिसर व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या बऱ्याच ठेवी अडकल्या होत्या.त्यामुळे या संस्थेचे लेखापरीक्षण होऊन त्यात लेखापरीक्षक किशोर जगन्नाथ कुलथे चौथे अप्पर लेखा परीक्षक कोपरगाव यांनी या संस्थेच्या संचालक मंडळावर ठपका ठेऊन या संस्थेचे अध्यक्ष चंद्रमोहन पापडेजा व संचालक प्रमोद वामनराव दंडवते,कृष्णराव रावसाहेब गाडे आदी संचालक व व्यवस्थापक शिवराम दशरथ पानगव्हाने इतर अशा १९ जणाविरुद्ध ठेवीही रक्कम पुरेशा तारणाभावी कर्ज वाटप केले,सहकार खात्याची पूर्व परवानगी न घेता कर्ज वितरण केले,अनाधिकाराने जिल्हा मध्यवर्ती बँके ऐवजी बाळासाहेब सातभाई मर्चंट बँकेत ठेवल्या,बेकायदा व्याजाचा सूट देणे,कर्जवसुलीसाठी पुरेशा उपाययोजना न करणे,कर्ज संचालक मंडळाच्या नातेवाईकांना देणे असा ठपका ठेऊन ठेवीदार अभासद यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.व त्यांच्या विरुद्ध भा.द.वि .कलम ४०६,४०९,१२०(ब),व ३४ अन्वये पोलीस ठाण्यात दाखल होती त्याची सुनावणी कोपरगाव वरिष्ठ दिवाणी न्यायालय क्रं.३ चे न्या. जे.एम.पांचाळ यांच्यापुढे नुकतीच संपन्न झाली आहे.त्यात दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला.आरोपींचा बाजूने अड्,दिलीप लासुरे यांनी काम पाहिले.न्या.पांचाळ यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून वरील १९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.अड्.दिलीप लासुरे यांना अड्.संदीप सांगळे यांनी सहकार्य केले आहे.सदर निकालाकडे कोपरगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागून होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close