जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दुसऱ्या लग्नासाठी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावात एका महिलेने आपल्याला आपला नवरा शार्दूल श्यामप्रसाद देव व सासरा श्यामाप्रसाद विश्वनाथ देव रा.श्रीराम मंदिराचे पाठीमागे,विवेकानंदनगर यांनी, “आम्हाला तू आवडत नाही”,”तू आम्हाला नको आहे”,”दुसरे लग्न करावयाचे आहे. या कारणांनी आपले लग्न झाल्यापासून आजतागायत आपला छळ करून मारहाण करून शिवीगाळ करून,दमदाटी करून घराबाहेर काढले अशा स्वरूपाचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला मंजिरी शार्दूल देव यांनी दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव शहरात वरील ठिकाणी शार्दूल देव व त्यांचे वडील शामप्रसाद देव यांचे कुटुंब रहाते. त्यांच्या मुलाचे २८ ऑक्टोबर २०१३ रोजी मंजिरी शार्दूल यांचेशी विवाह झाला होता.सुरुवातीचे नव्यानवलाईचे नऊ दिवस संपल्यावर त्यांच्यात वादावादी सुरु झाली.त्यात आपला नवरा शार्दूल देव व सासरा शामप्रसाद देव यांनी आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास प्रारंभ केला.आपल्याला वारंवार त्रास देण्यात आला.अखेर आपण वैतागून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.४०८/२०१९ भा.द.वि.कलम ४९८(अ),३२३,५०४,५०६ प्रमाणे दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.दरम्यान हे दोन्ही आरोपी विधी क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close