जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आरोग्य धोक्यात,आंदोलनाचा इशारा !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत नागरिकांनी कर भरूनही शहरात डास, धूळ,जागोजागी कचऱ्याची दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त झाले असून यात पालिका प्रशासनाने सुधारणा केली नाही तर आपण आगामी गुरुवार दि.१९ डिसेंबर पासून कोपरगाव नगरपरिषदेसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा कोपरगाव शहर शिवसेनेचे माजी अध्यक्ष भरत मोरे यांनी नुकताच एक निवेदन देऊन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिला आहे.

त्यांनी कोपरगाव नागरपरिषदेस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे कि,कोपरगाव शहरात डासांचे निर्मूलन होणे गरजेचे आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका शेजारील गटारीवर ढापे टाकावे,खंदक नाला बंदिस्त करावा.कोर्ट रस्ता ते मस्जिद पर्यंतच रस्ता सिमेंटचा बनवावा,शहरातील जलतरण तलाव सुरु करावा,खुल्या नाट्यगृहाची दुरुस्ती करावी,विस्थापित टपरी धारकांचे पुनर्वसन करावे,मोकाट जनावारांचा बंदोबस्त करावा.नगरपरिषद रुग्णालयात सोयी वाढवाव्या. स्मशान भूमीत कायमस्वरूपी कर्मचारी नेमावा.बाजारतळ ओट्यांचे काम सुरु करावे,गोदावरीच्या छोट्या पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी अशा जवळपास तीस मागण्या त्यांनी केल्या आहेत.व आपल्या मागण्याची दाखल न घेतल्यास आपण आंदोलन करू असा इशारा मोरे यांनी शेवटी दिला आहे.

निवेदनावर भरात मोरे,गगन हाडा, आकाश कानडे,राहुल देशपांडे,वाल्मिक चिने, युसूफ शेख,निलेश वाणी, गोविंद चव्हाण,सतीश शिंगाणे, अविनाश वाघ,विराट नरोडे आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close