जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव ब्राह्यण सभेच्या वतीने गुणगौरव कार्यक्रम उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांवातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ब्राह्यण सभेच्या वतीने नुकताच गेल्या तीन वर्षात विविध स्पर्धा परीक्षा,व विविध क्षेत्रात प्राविण्य दाखवीलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अहमदनगर येथिल दै.समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी होते

“आपण मुळचे कोपरगांवचे असुन आपल्याला तालुकास्तरावर समाजाने स्वतःचे मंगल कार्यालय उभे केले याचा निश्चित अभिमान वाटत असल्याचे नमूद केले आहे व युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावार उदयोगात भरारी घ्यावी”-महेंद्र कुलकर्णी पत्रकार.

कोपरगाव ब्राम्हण सभा शहरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवित असते.या वर्षी त्यांनी एस.एस.सी.परीक्षा ते पदवी,पदव्युत्तर,तसेच शिक्षक दिना निमित्तानं शहरातील शाळा,महाविदयालय प्राचार्य,आजी माजी शिक्षक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व निवड झालेल्या व्यक्तीचा गुणगौरव समारंभ नुकताच ब्राम्हण सभा मंगल कार्यालयात आयोजित केला होता.अहमदनगर येथिल भा.ज.पा.शहराध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांच्या शुभहस्ते पारीतोषिक वितरण झाले.
सदर प्रसंगी नासिक येथिल प्रसिध्द उद्योगपती धनंजय बेळे,ब्राम्हण सभेचे माजी अध्यक्ष सुधाकर कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई,प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,कार्यकारीणी सदस्य माजी अध्यक्ष वसंतराव ठोंबरे,डाॕ.मिलींद धारणगांवकर,अॕड.श्रध्दा जवाद,वंदना चिकटे,सहखजिनदार योगेश कुलकर्णी,संघटक गौरीष लव्हरीकर आदींसह समाजबांधव,विद्यार्थी,आजीमाजी शिक्षक या कार्यक्रमाला सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्तविक उपाध्यक्ष राजेंद्र जवाद यांनी तर भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले.प्रमुख पाहुणे धनंजय बेळे यांनी समाजाचे संघटन करणे खुप अवघड काम असुन सर्व समाज घटकांनी त्यासाठी एक विचाराने राहणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले.नगरचे भैय्या गंधे यांनी ब्राह्यण सभेच्या उपक्रमांचे कौतुक करुन ब्राह्यण सभेच्या विविध उपक्रमास मदत करु असे आश्वासन दिले आहे.
यावेळी ब्राह्यण सभेचे बांधकाम समितीचे प्रमुख प्रसाद नाईक यांनी मंगल कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असुन येत्या जानेवारीत ते सर्वासाठी उपयोगात येईल असे आश्वासन दिले आहे.

सदर प्रसंगी विविध क्षेत्रात निवड झालेल्या,यश संपादन केलेल्या व्यक्ती,शिक्षक दिना निमित्तानं शाळा,महाविदयालयांचे प्राचार्य,आजी माजी शिक्षक तसेच विदयार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे संचलन खजिनदार जयेश बडवे,संघटक महेंद्र कुलकर्णी,सहसचिव संदीप देशपांडे,अजिंक्य पदे,सदा धारणगांवकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल कुलकर्णी व रुपाली देशपांडे यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष संजीव देशपांडे यांनी केले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close