जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात अल्पशी रुग्णवाढ

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनीधी)

राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५४९ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०५ रुग्ण बाधित आढळले असून ५४४ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५३४ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत ०५ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०५ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण १० रुग्ण बाधित आढळले आहे.तर २४ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.

तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.मात्र शहरात ०२ रुग्ण आढळले आहे.त्यात वडांगळे वस्ती,अंबिका नगर येथे प्रत्येकी ०१ रुग्ण आढळले आहे. तथापि कोरोना रुग्णांत नैऋत्येकडील पोहेगाव जिल्हा परिषद गटात आजही रुग्णवाढ सुरूच राहिली ती ०४ एवढी आहे यात बहादरपुरात ०४ रुग्णांचा समावेश आहे.तर कोकमठाण येथे -०२,दहिगाव बोलका,सांगवी भुसार येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान वेस,सोयगावातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याची बातमी मिळत आहे.मात्र हे रुग्ण शेजारी राहाता.संगमनेर तालुक्यात उपचाहरार्थ भरती होत असल्याने त्यांच्या नोंदी तालुक्यात होत नाही.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ९१७ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १४९ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१६ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५५ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ६६ हजार ६७० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख ६६ हजार ६८० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.३५ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ५५२ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.३८ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख १५ हजार १९३ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०५ हजार २६३ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख ०३ हजार ३०० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ६२९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव,जवळके,बहादरपूर,अंजनापूर,रांजणगाव देशमुख आदी ठिकाणी रुग्ण लक्षणीयरित्या ०८ रुग्ण वाढले असले तरी ती संख्या आता कमी होताना दिसत आहे हि समाधानाची बाब आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close