जाहिरात-9423439946
खेळजगत

सिलंबम,स्वयंरक्षण व आत्माविश्वास वाढवण्यास एक परिपूर्ण खेळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सिलंबम,स्वयंरक्षण व आत्माविश्वास वाढवण्यास एक परिपूर्ण खेळ असल्याचे प्रतिपादन ऑल अहमदनगर डिस्ट्रीक्ट रुरल सिलंबम असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.झिया शेख यांनी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका कार्यक्रमात बोलताना नुकतेच केले आहे.

या सिलबंन स्पर्धेत कोपरगाव शहरातील २८ खेळाडू अहमदनगर जिल्ह्यातर्फे खेळलेल्या खेळाडूंनी ४२ सुवर्ण, ४ रजत, व ३ कांस्य पदके मिळवून नगर जिल्ह्याला प्रथम पारितोषिक मिळवून दिले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील ओम गुरुदेव ध्यानपीठ ओपन राज्य स्तरीय सिलंबम स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत.
कोकमठाण येथे ओम गुरुदेव ध्यानपीठ येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र ओपन सिलंबम राज्य स्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील नगर,रायगड,श्रीगोंदा,पिंपरी-चिंचवड,पुणे,नागपूर,ठाणे,औरंगाबाद,नाशिक या जिल्ह्यातील सुमारे २५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्या प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे अध्यक्ष पाशा अत्तार,कोपरगावच्या माजी नगर सेविका ताराबाई वाजे व गोविंद वाजे,राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजक संतोष खैरनार,हेमंत कोकाटे,नाझीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.ऑल अहमदनगर डिस्ट्रीक्ट रुरल सिलंबम असोसिएशनचे सचिव डॉ.अमरप्रीत शेख,प्रशिक्षक आयेशा पठाण,साहिल गवारे व राहील शेख,प्रसाद महावीर,क्रीडा विभाग प्रमुख आत्मा मालिक स्पोर्ट्सचे क्रीडा विभाग प्रमुख श्री शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

दिनांक ५ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी आलेल्या मयूर ढोकचौळे प्राचार्य एन.डी.ए.आत्मा मालिक मिलिट्री स्कूल,साईनाथ वरपे,व्यवस्थापक आत्मा मालिक स्पोर्ट्स संकुल,यांनी देखील प्रात्यक्षिक पाहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. या स्पर्धेत कोपरगाव शहरातील २८ खेळाडू व नगर जिल्ह्यातर्फे खेळलेल्या ४२ सुवर्ण, ४ रजत, व ३ कांस्य पदके मिळवून नगर जिल्ह्याला प्रथम पारितोषिक मिळवून दिले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे अध्यक्ष पाशा अत्तार यांनी सिलंबम ह्या खेळाचा प्रचार व प्रसार राज्यातच नाही तर संपूर्ण देशात वाढवला असल्याचे शेवटी म्हटले आहे.प्रसाद महावीर,क्रीडा विभाग प्रमुख आत्मा मालिक स्पोर्ट्सचे क्रीडा विभाग प्रमुख श्री शर्मा,यांनी स्पर्धेसाठी हॉल व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले असल्याबद्दल त्यांनी मान्यवरांचे आभार मानले आहे.उपस्थितांचे आभार डॉ.अमरप्रीत शेख यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close