जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वाळू चोरीचे वाहन पकडले,तलाठ्यास धक्काबुक्की,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे कार्यरत असलेले तलाठी हे आपल्या सहकाऱ्यांसोबत अवैध वाळू उपसा प्रतिबंधक पथकात कार्यरत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ते मोर्विस शिवारातील वनविभागाच्या काटवनातील अवैध वाळूउपसा थांबविण्यास गेले असता महिंद्रा कंपनीचे पिकअप वहांन त्यांनी रात्री साडे नऊच्या सुमारास ताब्यात घेऊन ते कोपरगावकडे निघाले असता वहानचालकाने कानळद फाट्या नजीक गाडी थांबवून त्यांना धक्काबुक्की करून उतरून देऊन तो परागंदा झाल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी फिर्यादी कामगार तलाठी शिवनाथ चंद्रभान थोरात यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी सुखदेव बबन कंक्राळे रा.रवंदे,हल्ली रा.सिन्नर व विलास उर्फ पांडू राजाराम लकारे रा.चासनळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तहसीलदार यांनी धामोरीचे तलाठी शिवनाथ थोरात व जयवंत भांगरे, सोमनाथ शिंदे, योगेश तांगडे,कोतवाल नवनाथ घारे असे पाच जणांचे पथकास घटनास्थळी पाठवले असता.त्या ठिकाणी त्यांना अवैध वाळू वाहतूक करताना वाहन आढळून आले.त्यात एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप (क्रं.एम.एच.15-एफ.व्ही.8997)हि आढळून आली त्यांनी सदरचे वाहन जप्त करून त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ते ताब्यात घेऊन त्यास कोपरगाव तहसील कार्यालयाकडे घेऊन जाण्यासाठी निघाले असता तो धामोरी फाट्यापासून थेट लासलगावच्या दिशेने निघाला त्यावेळी तलाठी थोरात यांच्या घटनेचे गांभीर्य लक्षात आले त्यांनी त्यास कोपरगावच्या दिशेने वाहन घेण्यास सांगूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले व त्यांना कानळद फाट्यावर धक्काबुक्की करून उतरून देऊन आपले वहान भरधाव वेगाने पळवून नेले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून अवैध वाळू वाहतूक करण्यास शासनाने प्रातिबंध केलेला आहे.तरीही वाळूला मिळणारे प्रचंड मुल्य पाहता अवैध वाळूचोर वाहतुक करणे थांबवत नाही.तथापि कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाली कि मोर्विस शिवारात काटवनातील वनीकरण विभागाच्या जमिनीत काही वाळू चोरांनी अवैध वाळूसाठा केलेला असून त्या ठिकाणी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही वाळू चोर आपल्या वाहनाने वाळू वाहतूक करत आहेत.

.त्यांनी ताबडतोब आपल्या अवैध वाहतुकीस प्रतिबंध करणाऱ्या पथकास पाचारण केले त्यात धामोरीचे तलाठी शिवनाथ थोरात व जयवंत भांगरे, सोमनाथ शिंदे, योगेश तांगडे,कोतवाल नवनाथ घारे असे पाच जणांचे पथकास घटनास्थळी पाठवले असता.त्या ठिकाणी त्यांना अवैध वाळू वाहतूक करताना वाहन आढळून आले.त्यात एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप (क्रं.एम.एच.15-एफ.व्ही.8997)हि आढळून आली त्यांनी सदरचे वाहन जप्त करून त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ते ताब्यात घेऊन त्यास कोपरगाव तहसील कार्यालयाकडे घेऊन जाण्यासाठी निघाले असता तो धामोरी फाट्यापासून थेट लासलगावच्या दिशेने निघाला त्यावेळी तलाठी थोरात यांच्या घटनेचे गांभीर्य लक्षात आले त्यांनी त्यास कोपरगावच्या दिशेने वाहन घेण्यास सांगूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले व त्यांना कानळद फाट्यावर धक्काबुक्की करून उतरून देऊन आपले वहान भरधाव वेगाने पळवून नेले आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.161/2019 भा.द.वि.कलम.353,379,365,323,504,506 प्रमाणे वरील दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तक्रारीत त्यानीं वाळू व वाहन मिळून 2 लाख 57 हजारांचा ऐवज गेला असल्याचे नमूद केले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close