कोपरगाव तालुका
ऊस उत्पादकांना उसाला जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्याची घोषणा !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरंगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण या पूर्वीही सर्वाधिक भाव दिला आहे व या गळीत हंगामातही जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांपेक्षा आपण सर्वाधिक भाव देणार असल्याची घोषणा माजी आ. अशोक काळे यांनी आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील मतदारांनी नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत क्रांती केली असून तालुक्याचे माजी आ. अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली विकास होईल.माजी आ. अशोक काळे हे जसे शब्द पाळण्यास पक्के होते तसेच नवोदितआ.काळे हे हि जनतेला दिलेला शब्द पाळतील व तालुक्याचा विकास होईल-उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे
सहकारी साखर कारखानदारीत अग्रणी असलेल्या गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन 2019-20 चा 65 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास माजी आ.अशोक काळे व त्यांच्या धर्मपत्नी पुष्पाताई काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष पदमाकांत कुदळे हे होते.
सदर प्रसंगी कर्मवीर जेष्ठ नेते छबूराव आव्हाड,सुधाकर आवारे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते डॉ.अजय गर्जे,साई संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर,संभाजी काळे,कारभारी आगवन,आनंदा चव्हाण,नारायण मांजरे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी,कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन,कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,सचिन रोहमारे,कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप,गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड आदींसह सर्व विभागाचे विभागप्रमुख,सभासद,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांना विजयी केल्याबद्दल मतदारांचे एका शब्दात आभार व्यक्त केले आहे.व पुढील काळात विकास योजना राबविण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असून हि समाधानाची बाब असल्याने तालुक्यातील मतदारांनी,सभासदांनी आ. आशुतोष काळे यांना साथ द्यावी-माजी आ. अशोक काळे
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,गत वर्षी पावसाळा कमी असल्याने गळीताला ऊस कमी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी कार्यक्षेत्राच्या बाहेरून जवळपास दीड लाख टन ऊस आणावा लागेल.उसाची कमतरता असल्यानेच या वर्षी साखर संचालकांनी गळीत हंगाम उशिरा सुरु केला आहे.कार्यक्षेत्रातील ऊसामुळे 70 हजार टन गाळप होणार आहे.यंदा पाऊस उशिरा मात्र पुरेशा प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान झाले असले तरी ऊस लागवडीला उज्वल भविष्य आहे.या वर्षी ऊस कामगार,वाहतूकदार,कारखाना कामगार यांना चालू हंगाम अडचणींचा जाणार असल्याचे सूतोवाच केले असले तरी आपण ऊस उत्पादकांना भाव मात्र कमी देणार नसल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.गतवर्षी आपण 2 हजार 500 रुपयाने प्रति टन ऊस भाव दिला होता याची आठवणही त्यांनी करून दिली.व शेतकऱ्यानी या वर्षी जास्त उस लागवडी कराव्या असे आवाहन केले.त्यावेळी त्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांना विजयी केल्याबद्दल मतदारांचे एका शब्दात आभार व्यक्त केले आहे.व पुढील काळात विकास योजना राबविण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असून हि समाधानाची बाब असल्याचे सांगून आ. काळे यांना तालुक्यातील मतदारांनी,सभासदांनी साथ द्यावी आवाहन केले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना पद्मकांत कुदळे यांनी कोपरगाव तालुक्यातील मतदारांनी या निवडणुकीत क्रांती केली असून तालुक्याचा माजी आ. अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली विकास होईल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रारंभी माजी आ.अशोक काळे व पुष्पाताई काळे या द्वयीच्या हस्ते कारखान्याच्या गव्हाणीत उसाची मोळी अर्पण करून विधिवत हंगाम सुरु केल्याचे जाहीर केले आहे.त्या नंतर माजी खा.शंकरराव काळे यांच्या प्रतिमेला अभिवादन करवून कार्यक्रमास प्रारंभ केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले.