जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपालिका तोडफोड प्रकरण,जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणार दाद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी )

कोपरगाव नगरपालिकेत विद्यमान नगरसेवकांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून पालिकेतील बांधकाम विभाग व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गोर्डे यांना अतिक्रमण काढल्याच्या रागातून केलेली मारहाण निदनीय आहे. हे दुष्कृत्य करण्यामागे जरी अतिक्रमन काढण्याचे कारण पुढे करण्यात येत असले तरी आपल्या बगलबच्यांना काम बांधकाम विभागाकडून कामे न मिळाल्याचाच रोष जास्त दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे मनसे कार्यकर्ते सुनील फंड यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.

“मतदारांच्या नजरेत भरण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला अधिकार आहे मात्र एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याला मारहाण करणे समाज कदापि मान्य करणार नाही.आणि एवढे करूनही आपले राक्षसीकृत्य लपविण्यासाठी आरोपी हे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे लपतात हे अत्यंत क्लेशकारक आहे”-सुनील फंड,मनसे कार्यकर्ते.

गुरुवार दि.२२ रोजी दुपारी ११ ते १२ यावेळेत कोपरगाव नगरपालिकेत लोकशाहीला पायदळी तुडवत गुंडशाहीचे ओंगळवाणे दर्शन शहरातील नागरिकांना पहायला मिळाले. त्यामुळे निश्चितपणे कोपरगाव शहराची मान निश्चितपणे खाली गेली आहे.नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. मतदारांच्या नजरेत भरण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला अधिकार आहे मात्र एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याला मारहाण करणे समाज कदापि मान्य करणार नाही.आणि एवढे करूनही आपले राक्षसीकृत्य लपविण्यासाठी आरोपी हे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे लपतात हे अत्यंत क्लेशकारक आहे. हे रणकंदन होण्यामागे अतिक्रमण काढण्याचे कारण जरी पुढे करण्यात येत असले तरी आपल्या बगलबच्यांना बांधकाम विभागाने काम न दिल्याचा रोष जास्त दिसून येत आहे.
अतिक्रमण करण्याची त्यांची आजची हि काही पहिलीच वेळ नाही हि तर त्यांची जुनीच परंपरा आहे.हे अतिक्रमण शहराला लागलेली कीड असून यांचा सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच त्रास होत आला आहे.नागरिकांच्या जीवावर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून जायचे. मिळालेल्या पदाचा गैरवापर मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यासाठी करायचा आणि अतिक्रमण करून शहराला वेठीस धरायचे,धमकावयचे हे नित्याचेच झाले आहे.त्यामुळे आजही हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय करू शकत नाही.मात्र आता त्याचा कळस झाला असून शहरातील नागरिकांना आता त्याचा वीट आला आहे. आपले व्यवसाय इमानेइतबारे करून आपल्याला जनतेने ज्या विश्वासाने नगरसेवक केले त्या उद्देशालाच हरताळ फासत दमबाजी करून मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्याचा उद्योग यापुढे बंद झाला पाहिजे. अतिक्रमित जागेवर बेकायदा व्यवसाय सुरु करायचे आणि हे अतिक्रमण काढले की तोडफोड करायची अशा प्रवृत्तींना आता कुठे तरी आळा बसणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे सुनील फंड यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close