जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी खा.शंकरराव काळे यांचा मंगळवारी पुण्यस्मरण कार्यक्रम

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक,व माजी खासदार शंकरराव काळे यांच्या सातव्या पुण्यस्मरण निमित्त पुष्पांजली कार्यक्रम मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कर्मवीर काळे स्मृती-उद्यान गौतमनगर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमा निमित्त कराड येथील प्रसिद्ध कीर्तनकार बाळकृष्णदादा वसंतगडकर यांचा जाहीर हरी किर्तनाचा कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर मैदान येथे होणार असल्याची माहिती कर्मवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.

माजी खा.शंकरराव काळे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त साई सुवर्ण प्रतिष्ठान गौतमनगर व संजीवनी रक्तपेढी कोपरगाव यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त साई सुवर्ण प्रतिष्ठान गौतमनगर व संजीवनी रक्तपेढी कोपरगाव यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी माजी आ. अशोक काळे, स्नेहलताई शिंदे, अनिल शिंदे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, आ. आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पुण्यस्मरण कार्यकमासाठी कोपरगाव मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांनी तसेच रयत परिवाराने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close