कोपरगाव तालुका
कोपरगावात खरीप पिकांचे सरसकट पंचनामे करा-आ. काळे यांचे अधिकाऱ्यांना आदेश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून शेतकऱ्यांना त्यातून सावरणे कठीण आहे.अद्यापही हवामान खात्याने अजूनही काही दिवस पावसाची शक्यता वर्तवल्याने उरलेसुरले खरीप वाया जाणार असल्याने अधिकाऱ्यांनी सरसकट पंचनामे करावे असे आदेश कोपरगावचे नवनिर्वाचित आ. आशुतोष काळे यांनी नुकतेच दिले आहे.
आ.आशुतोष काळे यांनी परतीच्या पावसाने झालेले नुकसान व सुरु असलेल्या पंचनाम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना येत असलेल्या अडचणीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी कोपरगाव येथील संपर्क कार्यालयाच्या सभागृहात आज सकाळी अकराच्या सुमारास आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
बाजरी, मका, सोयाबीन या पिकापासून कोरडा चारा तयार केला जातो मात्र पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाल्यामुळे कोरडा चारा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्याबाबत प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दाखल करावा. काही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे की, पंचनामा करणारे प्रशासकीय कर्मचारी उभ्या पिकांचा पंचनामा करीत नाही. त्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देवून सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे सर्व शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-आ. काळे
या बैठकीसाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, कारभारी आगवण, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरपरिषदेचे माजी गटनेते डॉ. अजय गर्जे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,पंचायत समितीचे गटनेते अर्जुनराव काळे, राहुल रोहमारे, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, सुनील शिलेदार, हिरामण गंगूले, मंदार पहाडे,संदीप पगारे,मेहमूद सय्यद,राजेंद्र वाघचौरे, संतोष चवंडके, प्रसाद साबळे,कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, कोळपेवाडी मंडल कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कोपरगाव व पोहेगाव मंडल कृषी अधिकारी चांगदेव दवणे,जेलर रविंद्र देशमुख आदी प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, सर्वच पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. बाजरी, मका, सोयाबीन या पिकापासून कोरडा चारा तयार केला जातो मात्र पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाल्यामुळे कोरडा चारा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्याबाबत प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दाखल करावा. काही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे की, पंचनामा करणारे प्रशासकीय कर्मचारी उभ्या पिकांचा पंचनामा करीत नाही. त्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देवून सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशा सूचना दिल्या. सर्व शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालयात सादर केलेल्या प्रस्तावांची सद्य स्थिती आमदार काळे यांनी यावेळी जाणून घेतली. पूरग्रस्त अनुदानापासून वंचित असणाऱ्या लाभार्थींना लवकरात लवकर अनुदान द्यावे. सात बारा, फेर फार, खरेदी-विक्री, सातबार दुरुस्ती, आठ अ आदी उतारे काढण्याबाबत व नोंदी करण्यासाठी दिरंगाई होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असून यामध्ये सुधारणा कराव्या. तालुक्यातील शिवरस्त्यांचा प्रश्न आजही अनुत्तरीत असून हे शिवरस्ते मोकळे करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावी. प्रत्येक समाजाला त्याच्या जातीचे दाखले अतिशय कमी वेळात व कमी त्रासात मिळावे यासाठी प्रभावी माध्यम वापरून जातीचे दाखले,आदिवासी जातीचे दाखले, रेशन कार्ड मोहीम, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अपंगासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना यासाठी कॅम्प आयोजित करावे याबाबत सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली. या बैठकी दरम्यान महसूल व कृषी विभागात मागील पाच वर्षात कर्मचारी भरती न झाल्यामुळे अनेक पदे रिक्त असून त्याचा अतिरिक्त भार सहकारी कर्मचाऱ्यांवर पडत असल्यामुळे कामात अडचणी येत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी रिक्त पदी कर्मचारी नेमणुकीसाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना केल्या.