जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नगराध्यक्ष वहाडणे यांनी केला आ. काळेंचा सत्कार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नूतन आ.आशुतोष काळे यांचा निवडणुकीतील विजया बद्दल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सत्कार केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

गौतम बँकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या खरीप नुकसान आढावा बैठकी नंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन नूतन आ. आशुतोष काळे यांच्या विजयाबद्दल त्यांचा हार घालून सत्कार केला असून वैर केवळ निवडणुकीपुरतेच धरायचे असते असा संदेश दिला आहे.व आगामी काळात कोपरगाव नगरपरिषदेत आम्ही एकत्र येऊन लढणार असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला असल्याचे मानले जात आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,मावळत्या आ. स्नेहलता कोल्हे,नूतन आ.आशुतोष काळे व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे असा चौरंगी सामना रंगला होता.त्या अटीतटीच्या लढतीत आशुतोष काळे यांचा 822 मतांनी विजय झालेला आहे.त्या नंतर निवडणूक संपली होती.त्या नंतर बहुधा लढलेले उमेदवार बऱ्याच वेळा आमने-सामने येण्याचे टाळतात.मात्र नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या पारंपरिक पद्धतीला फाटा देत मोठ्या मनाने आज सकाळी गौतम बँकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या खरीप नुकसान आढावा बैठकी नंतर आपल्या सहकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन नूतन आ. आशुतोष काळे यांच्या विजयाबद्दल त्यांचा हार घालून सत्कार केला असून वैर केवळ निवडणुकीपुरतेच धरायचे असते असा संदेश दिला आहे.व आगामी काळात कोपरगाव नगरपरिषदेत आम्ही एकत्र येऊन लढणार असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला असल्याचे मानले जात आहे.सदर प्रसंगी कोपरगाव नरेंद्र मोदी मंचचे शहराध्यक्ष विनायक गायकवाड, माजी नगरसेवक संजय कांबळे,राजेंद्र खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कोपरगाव नगरपरिषदेच्या विकास कामांबाबतही चर्चा झाली.असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा संदेश शहर विकासासाठी सकारात्मक मानला जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close