जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात ग्राम सुरक्षा यंत्रणांचे प्रशिक्षण संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते.अशा परिस्थितीत ग्राम पातळीवर ग्राम सुरक्षा यंत्रणेची भ्रमणभाष संदेश प्रणाली कार्यान्वित असेल तर संकट निर्मुलनासाठी महत्वाचे कार्य ग्रामसुरक्षा यंत्रना करू शकते असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलत होते.

तालुक्यातील गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी,दरोडा,आग-जळीताच्या घटना,निधन गंभीर अपघात,वन्य प्राणी हल्ला,पूर,भूकंप,ग्रामसभा,सरकारी योजना,सरकारी सूचना,रेशन वाटप,आदिंसह आपत्कालीन घटनांमध्ये सर्व गावाला एकाच वेळी सूचना देण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक १८०० २७० ३६०० किंवा ९८२२११२२८१ या नंबरवर संपर्क साधावा.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या वतीने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोपरगाव,कोकमठाण,संवत्सर,शिंगणापूर,जेऊरकुंभारी,डाऊच खुर्द,डाऊच बुद्रुक,चांदगव्हाण,जेऊर पाटोदा,मुर्शतपुर,टाकळी या गावातील प्रमुख नागरिक,सरपंच पोलिस पाटील,नगरसेवक तसेच पोलीस अंमलदार यांचे साठी ग्राम सुरक्षा यंत्रणाचे प्रशिक्षण कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित केले होते त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी तहसिलदार योगेश चंद्रे,पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे,नगरसेवक मेहमूद सय्यद,नगरसेवक,सरपंच,उपसरपंच,पोलिस पाटील,पंचायत समिती सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष,स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांचे सह ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”संकट काळात स्वतःच्या मोबाईलवरुन सर्व गावकऱ्यांना एकाचवेळी काॅलच्या माध्यमातून सूचना देणे,सावध करणे किंवा मदतीला बोलाविण्यासाठी यंत्रणा आहे.पोलिस स्टेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावात मालमत्ते संदर्भात व शरीराविरुध्द होणारे गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी,दरोडा,आग-जळीताच्या घटना,निधन वार्ता,मोकाट जनावरे व पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला,लहान मुले हरविणे, शेतातील पिकांची चोरी,गंभीर अपघात,वन्य प्राणी हल्ला,पूर,भूकंप,ग्रामसभा,सरकारी योजना,सरकारी सूचना,रेशन वाटप,आदिंसह आपत्कालीन घटनांमध्ये सर्व गावाला एकाच वेळी सूचना देण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक १८०० २७० ३६०० किंवा ९८२२११२२८१ या नंबरवर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले.तसेच प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर पोलीस पाटील व ग्रामपंचायत यांनी आपापल्या गावातील नागरिकांचे मोबाईल नंबर समाविष्ट करुन सदर यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी.असे सांगितले.या वेळी आपत्ती काळात भ्रमणध्वनी संदेश प्रणालीचा वापर कसा करावा.तसेच संदेश कसा सांगावा.याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.तसेच चलचित्र फित द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.कुठल्याही संकटाला प्रसंग पाहून घाबरून न जाता धीराने सामोरे गेले तर संकट दूर जाते.ग्राम सुरक्षा यंत्राना मुळे नागरिक चा आत्मविश्वास बळकट होईल व होणारे गुन्हे प्रतिबंध व गुन्हे शोध कामी पोलिसांना मदत होईल.प्रत्येक ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी एकत्र येऊन ही अभिनव कल्पना समजून घेवून ग्रामस्तरावर कार्यान्वित करावी.तसेच शहरी भागात ही नगरपालिका प्रशासनाने नमूद यंत्रणा कार्यान्वित करावी.या यंत्रणेचा संकटकाळी सदुपयोग करावा.असे शेवटी आवाहन केले आहे.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपनिय शाखेचे खारतोडे यांनी केले.

प्रशिक्षण यशस्वीतेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे अशोक हिंगले,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांचे सह कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत नागरे,संजय पवार,पो.काॅ राम खरतोडे,पो.काॅ.धोंगडे,सचिन अनर्थे तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close