कोपरगाव तालुका
दहिगाव बोलका येथील घरकुल लाभार्थ्यांना विमा कवच प्रदान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या वतीने घरकुलांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शंभर दिवसांचे महाआवास अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानात निवड झालेल्या लाभार्थ्यांना अभिसरणाअंतर्गत इतर योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे.त्यानुसार दहेगाव बोलका येथे ग्रामपंचायत,बँक ऑफ महाराष्ट्र यांचेद्वारे ५० लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री बिमा सुरक्षा योजना या योजनांसाठी वार्षिक हप्ता भरून नोंदणी करण्यात आली असून या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विमा पाँलिसी नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक भारतातील सरकारद्वारे पुरस्कृत अपघात विमा योजना आहे.याचा मूळ उल्लेख अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारताच्या २०१५ च्या अंदाजपत्रकात,फेब्रुवारी २०१५ मध्ये केला होता.याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेद्वारे कोलकाता येथे ९ मे ला झाले होते.राज्य शासनाच्या वतीने घरकुलांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शंभर दिवसांचे महाआवास अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत हे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक भारतातील सरकारद्वारे पुरस्कृत अपघात विमा योजना आहे.याचा मूळ उल्लेख अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारताच्या २०१५ च्या अंदाजपत्रकात,फेब्रुवारी २०१५ मध्ये केला होता.याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेद्वारे कोलकाता येथे ९ मे ला झाले होते.राज्य शासनाच्या वतीने घरकुलांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शंभर दिवसांचे महाआवास अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानात निवड झालेल्या लाभार्थ्यांना अभिसरणाअंतर्गत इतर योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे.त्या अंतर्गत दहिगाव बोलका ग्रामपंचायतीने हि योजना आपल्या लाभार्थ्यांना राबवली आहे.त्या लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखाधिकारी महेंद्र सुराळकर,विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे,सरपंच साधना देशमुख,रविंद्र देशमुख,ग्रामविकास अधिकारी दिगंबर बनकर व विमा प्रतिनिधी गिरीश नारंग आदी प्रमुख मान्यवरांसह घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
महाआवास अभियान अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना विज जोडणी,गॅस कनेक्शन,शौचालय बांधकाम,अकुशल मजुरी,इत्यादी लाभ दिले जातात.यामध्ये ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन विमा योजनांची जोड दिली आहे.यामुळे घरकुल लाभार्थ्यांना विमा कवच लाभणार आहे.तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमध्ये देखील असाच उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न असल्याहची माहिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.