जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नागरिकांनी फुले जनारोग्य योजनेचा लाभ घ्यावा-अमित फरताळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील आत्मा मालिक रुग्णालयात नगर-नाशिक जिल्ह्यातील रुग्णांनी व नागरिकांनी या रुग्णालयात सुरु असललेल्या महात्मा फुले जनारोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या रुग्णालयाचे व्यवस्थापक अमित फरताळे यांनी नुकतेच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.

“आत्मा मालिक या रुग्णालयांत हृदयरोग तज्ज्ञ डॉ.निलेश पुरकर यांनी एका सत्त्तर वर्षीय इसमाचे बायपास सर्जरी करून जीवनदान दिले आहे.सदर व्यक्ती हि तीनशे कि.मी.असलेल्या गंगाखेड येथून आली होती.त्या आवश्यक मदत रुग्णालय प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.त्याला जीवदान देण्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.पूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.विशेष म्हणजे हि योजना महात्मा फुले जनारोग्य योजेनंतर्गत मोफत करण्यात आली आहे”-अमित फरताळे. व्यस्थापक आत्मा मालिक हॉस्पिटल.

सरकारने हि योजना गरजू नागरिकांसाठी सुरु केली आहे.महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र,असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड,मतदार कार्ड,वाहन चालक परवाना,आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि सात बारा उतारा आवश्यक असतो.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी ३४ निवडक विशेष सेवा अंतर्गत ९९६ प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि १२१ शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात.या योजनेत कोरोना वरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला.२०२०-२१या आर्थिक वर्षात डिसेंबर-२०२० पर्यंत ९३ हजार ८८४ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

यावं वेळी ते म्हणाले की,या रुग्णालयांत हृदयरोग तज्ज्ञ डॉ.निलेश पुरकर यांनी एका सत्त्तर वर्षीय इसमाचे बायपास सर्जरी करून जीवनदान दिले आहे.सदर व्यक्ती हि तीनशे कि.मी.असलेल्या गंगाखेड येथून आली होती.त्या आवश्यक मदत रुग्णालय प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.त्याला जीवदान देण्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.पूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.विशेष म्हणजे हि योजना महात्मा फुले जनारोग्य योजेनंतर्गत मोफत करण्यात आली आहे.त्यामुळे नगर-नाशिक व नजीकच्या जिल्ह्यातील रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक अमित फरताळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close