जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सोमैय्या महाविद्यालयात वसुंधरा दिन उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयातील भूगोल विभागाच्यावतीने वसुंधरा दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम मोठया उत्साहात आयोजित केला होता.कोविड नियमांचे पालन करत मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे.त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते.हा दिन साजरा करण्यामुळे जगभर व्यापक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक चालना मिळते.वसुंधरा दिन हा जगातील सर्वाधिक मोठा कार्यक्रम आहे.भिन्न पार्श्‍वभूमी,श्रद्धा,विश्‍वास आणि राष्ट्रीयत्व असलेले जगभरातील सर्व लोक हा दिन साजरा करतात.

वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे.त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते.हा दिन साजरा करण्यामुळे जगभर व्यापक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक चालना मिळते.वसुंधरा दिन हा जगातील सर्वाधिक मोठा कार्यक्रम आहे.भिन्न पार्श्‍वभूमी,श्रद्धा,विश्‍वास आणि राष्ट्रीयत्व असलेले जगभरातील सर्व लोक हा दिन साजरा करतात. या कार्यक्रमात दरवर्षी एक अब्जाहून अधिक लोक सहभागी होतात.कोपरगावात सोमैय्या महाविद्यालयात हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी प्राचार्य म्हणाले की,”आजच्या काळात आपल्या सर्वांनाच ऑक्सिजनचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आले आहे.पृथ्वी व मानव वाचवायचा असेल तर आपण सर्वांनी वृक्षारोपण ही जनचळवळ करावी लागेल.यामध्ये समाजातील सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.”

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष पगारे, भूगोल विभाग प्रमुख डॉ.गणेश चव्हाण,चासनळी येथील कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य नारायण बारे, कार्यालय अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे, बी.बी.ए विभागाचे प्रमुख प्रशांत भदाने व राष्ट्रीय सेवा योजना अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक डॉ.शैलेंद्र बनसोडे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close