निवडणूक
नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली,खळबळ!

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावसह १२ पैकी ०४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या असल्याची माहिती आताच हाती आली असून ज्या नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्या त्या ठिकाणी या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्याची माहिती हाती आली असून त्याला कोपरगाव नगरपरिषद सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी धास्ती घेतली आहे.

नगराध्यक्ष पदासह ३० नगरसेवक पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून नवीन कार्यक्रमानुसार बारामती नगरपरिषदेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.०२ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.दुसऱ्या दिवशीच म्हणजे ०३डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. ०४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.अशातच राज्यात ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषदाच्या अध्यक्षपदावरून आक्षेप आहे त्या ठिकाणी सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी ०४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.
दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलवली असून त्याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्धी माध्यमांना देणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे.त्यानंतर खरी दिशा स्पष्ट होणार आहे.
या कार्यक्रमानुसार सर्व संबंधित अधिकारी,कर्मचारी व राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोपरगाव नगरपरिषदेचे सदर निवडणूक प्रक्रिया पुन्हा एकदा संपूर्ण होणार की,आहे तेथून सुरू होणार याबाबत अद्याप निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना नाही मात्र त्याबाबत त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असून त्यात वरिष्ठ अधिकारी त्यांना पुढील आदेश देणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.
नवीन माहितीनुसार कोपरगाव नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी दोन डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया तात्पूर्ती स्थगित करण्यात आली आहे.नगराध्यक्ष पदासह ३० नगरसेवक पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून नवीन कार्यक्रमानुसार बारामती नगरपरिषदेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
दरम्यान कोपरगाव नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना व उद्या रात्री प्रचार संपत असताना सर्वच पक्षांना पुन्हा एकदा आपला डाव मांडावा लागणार असून उमेदवारीचा खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागणाऱ्या पक्षीय आणि अपक्ष उमेदवारांना आता दिवसा चांदण्या दिसायला लागल्या आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा आरोपांचा शिमगा साजरा होणार असल्याने शहर वासियांची मोठी करमणूक होणार आहे.
बातमी अद्यावतीकरण सुरू आहे…..



