जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव सर्वसाधारण सभेतील ‘तो’विषय अखेर रद्द बादल

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

दि.१६ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत विषय क्र.११ कोल्हे गटाने नामंजूर केललेला विषय कोपरगाव नगरपरिषदने अखेर रद्द केला असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली आहे.

“कोल्हे” यांनी स्वतःच्याच नगरसेवकांना फसवून-अंधारात ठेवून आपल्याकडे अर्ज दिलेला आहे.पूर्वीच कधीतरी घेऊन ठेवलेल्या सह्यांचा कागद या अर्जासोबत जोडलेला आहे.काही नगरसेवकांनी आपल्याला भेटून सांगितले कि,”कामे करू नका” असे लिहिलेल्या कुठल्याही अर्जावर आम्ही सही केलेली नाही.आम्हाला आमच्या प्रभागातील कामे करून घ्यायची आहेत”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेच्या दि.१६ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या अनेक प्रभागातील महत्वाची २८ विकासकामे करता येणार नव्हती,म्हणून पालिकेने महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अन्वये जिल्ह्याधिकारी यांचेकडे सदरची कामे मार्गी लागण्यासाठी अर्ज केला होता.दोन वेळा सुनावणी घेतल्यानंतर दि.२३ मार्च रोजी पुढीलप्रमाणे निर्णय देण्यात आला.सदर कामांबाबतची अंतिम मंजुरी देईपर्यंतची प्रक्रिया ही कायदेशीरपणे पूर्ण झाल्याने सदरची काही कामे अंदाजपत्रकिय दराने व काही कामे अंदाजपत्रकापेक्षा कमी दराची असल्याने सदर प्रक्रिया रद्द करणे कायद्यास अभिप्रेत नाही.शासकिय संस्थामार्फत तांत्रिक मान्यता देण्यात आली असल्याने अंदाजपत्रके जास्तीची आहेत असे म्हणणेही उचित नाही.नवीन दरसुचीनुसार अंदाजपत्रके वाढणार असून पुन्हा तांत्रिक फीही भरावी लागणार यामुळे नगरपरिषदेस आर्थिक भार पडणार आहे.सदरची कामे रद्द झाल्यास नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होऊन कामास विलंबही होऊ शकतो.पुन्हा पुन्हा तीच प्रक्रिया राबविणे उचित होणार नाही.म्हणून दि.१६ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र.११ तहकूब करण्यात येत आहे.

मात्र इतके सर्व होऊनही कोल्हे गटाने नगरसेवकांच्या सह्यानिशी पालिकेकडे अर्ज देऊन मागणी केली कि सदरची कामे करण्यात येऊ नयेत,होणाऱ्या आर्थिक नुकसानीस आम्ही जबाबदार रहाणार नाही.आम्ही तुमच्या विरुद्ध फौजदारी दंड संहितेनुसार कारवाई करू.राजकिय द्वेषाने पछाडलेला कोल्हे गट मला श्रेय मिळू नये यासाठी शहर विकासकामानाही आडवा येत आहे.सर्वात वाईट म्हणजे “कोल्हे” यांनी स्वतःच्याच नगरसेवकांना फसवून-अंधारात ठेवून आपल्याकडे अर्ज दिलेला आहे.पूर्वीच कधीतरी घेऊन ठेवलेल्या सह्यांचा कागद या अर्जासोबत जोडलेला असल्याचा आरोप नगराध्यक्ष वहाडणे यांनी केला आहे.कारण कोल्हे गटाच्या काही नगरसेवकांनी मला भेटून सांगितले कि,”कामे करू नका” असे लिहिलेल्या कुठल्याही अर्जावर आम्ही सही केलेली नाही.आम्हाला आमच्या प्रभागातील कामे करून घ्यायची आहेत,निवडणूक जवळ आलेली आहे.जनतेचाच नव्हे तर स्वतःच्याच नगरसेवकांचाही विश्वासघात करणाऱ्या कोल्हे गटाच्या खोटारड्या नेत्यांचा अध्यक्ष वहाडणे यांनी जाहीर निषेध केला आहे.पूर्वीच कधीतरी घेऊन ठेवलेल्या सह्यांचा कागद या अर्जासोबत जोडणाऱ्या कोल्हे गटाने निचपणाचा कळस गाठल्याचा आरोप केला आहे.नगरसेवक त्यांच्या धाकामुळे जाहीरपणे बोलत नाहीत.त्यांनी नगरसेवकांना वेठबिगार समजू नये.सह्यांचा असाच गैरवापर करून हे नेते नगरसेवकांचे राजीनामेही जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवू शकतात.यानंतर हे नेते नगरसेवकांना आपल्या विरुद्ध बोलायला,बातम्या द्यायला भाग पाडणार असल्याची आपल्याला जाणीव आहे.शिवाय काही पाकिटवाले दुसऱ्या बॅनरखाली मेसेज टाकायला ठेवलेले आहेतच. ते कोण कोण हे शहरवासीयांनाही माहित आहे.

ठराव क्र.११ तहकूब करून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयानुसार सदरची कामे लवकर सुरू करायची आहेत.कारण पावसाळा सुरू झाला तर कामे करणे अवघड होईल.सर्व नगरसेवकांना मी पत्र पाठवून विचारणा करणार आहे कि “तुमच्या प्रभागातील कामे करायचेत कि नाही? कारण कार्यादेश देऊन प्रत्यक्ष काम सुरू केल्यावर कोल्हे गटाने कामे मधेच बंद पाडली तर जास्त नुकसान होईल.म्हणून “माझ्या प्रभागातील काम करा किंवा करू नका” असे पत्र नगरसेवकांनी दिल्यावर कामे सुरू करणे योग्य होईल असे मला वाटते.

शहरातील अनेक नागरिक,राष्ट्रवादीचे नगरसेवक,अपक्ष व शिवसेनेचे दोन नगरसेवक हे सातत्याने सदरची कामे लवकर चालू करा अशी मागणी करत आहेत. त्यानुसार लवकरच कामे मार्गी लागणार असल्याचा दावा नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close