जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात ऑक्सिजनच्या आणखी ५० खाटा वाढवणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे.ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी २८ ऑक्सिजन बेड आहेत.मात्र बाधित रुग्णांच्या वाढत असलेल्या संख्येमुळे संभाव्य धोका ओळखून बाधित गंभीर रुग्णांना ऑक्सिजन खाटांची कमतरता जाणवू नये यासाठी एस.एस.जी.एम.महाविद्यालयात सुरु असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी दिले आहे.

“या कोरोना विषाणूंचा प्रसार क्षमता अधिक असल्यामुळे व संशयित रुग्णांच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.संशयित रुग्णासाठी आवश्यक असणाऱ्या तपासणी व चाचण्या जास्तीत जास्त प्रमाणात करून या चाचण्यांचे अहवाल वेळेत यावे यासाठी योग्य त्या उपाय योजना केल्या जातील”-आ.आशुतोष काळे.

कोपरगाव तालुक्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तहसील कार्यालयात आ. काळे यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते व शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत कोरोना आढावा बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,डॉ.वैशाली आव्हाड,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,उपसभापती अर्जुनराव काळे,शिवेसना उत्तर विभाग जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,शिवसेना शहरप्रमुख कालविंदरसिंग डडीयाल,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.महेंद्र गोंधळी,व्यापारी संघर्ष समितीचे अध्यक्ष अंकुश वाघ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीर डागा,ओमप्रकाश कोयटे,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे,राष्ट्रवादीचे नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे, संदीप पगारे, मेहमूद सय्यद,सुनील शिलेदार,अजीज शेख,राजेंद्र वाघचौरे,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत दिवसेंदिवस वाढत आहे.वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत.मागील काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेवून ३५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून आत्मा मलिक शैक्षणिक संकुलाच्या वसतिगृहात हे कोविड सेंटर सुरु झाले आहे.या प्रयत्नांना तालुक्यातील जनतेचे सहकार्य मिळाल्यास आपण निश्चितपणे या कोरोना संकटाला परतावून लावू.त्यासाठी सर्व नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून मुखपट्या,सामाजिक अंतर राखणे व हात वारंवार प्रतिबंधात्मक साधने किंवा साबणाने धुणे आवश्यक आहे.या कोरोना विषाणूंचा प्रसार क्षमता अधिक असल्यामुळे व संशयित रुग्णांच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.संशयित रुग्णासाठी आवश्यक असणाऱ्या तपासणी व चाचण्या जास्तीत जास्त प्रमाणात करून या चाचण्यांचे अहवाल वेळेत यावे यासाठी योग्य त्या उपाय योजना केल्या जातील. तसेच संभाव्य धोका ओळखून कोविड केअर सेंटरमध्ये जास्तीत जास्त सोयी सुविधा निर्माण केल्या जातील.आरोग्य विभागाकडे कर्मचारी संख्या वाढविली जाईल व औषधांचा तुटवडा भासू देणार नाही अशी ग्वाही आ.काळे यांनी यावेळी दिली.या कोरोना युद्धात प्रत्येक नागरिक कोरोना योद्धा आहे.त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडावी. सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर नियंत्रण मिळवू.प्रत्येक अडचणीच्या वेळी आपण जनता व प्रशासनाच्या सदैव सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.सर्व औषध व्यवसायिकांनी शासनाच्या दरानुसारच रुग्णांच्या नातेवाईकांना औषध विक्री करावी.औषधांची कुत्रिम टंचाई निर्माण करू नये. अशा जीवघेण्या संकटात परिस्थितीचा गैरफायदा न घेता आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी व आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close