जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात कोल्हे गटाचा पुन्हा एकदा फज्जा,जिल्हाधिकाऱ्यांनी कामास दिला हिरवा कंदील

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आपल्याच प्रभागातील रस्त्यांची ३१ कामे नामंजूर करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या विरोधात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या अपिलाचा निकाल आज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जाहीर केला असून त्यात कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा दावा फेटाळला असल्याने भाजप (कोल्हे गट) तोंडघशी पडला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसह नागरिकांनी फटाके वाजवून जोरदार स्वागत केले आहे.

“शहर विकासाला खोडा घालणे कायद्याला हे अभिप्रेत नाही.मंजूर निविदा रद्द करण्याचा कोणालाही पाशवी बहुमताच्या जोरावर अधिकार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.बहुमताची मस्ती चांगली नसते जनहिताच्या कामांना विरोध करणे कोणालाही परवडणारे नाही.कोल्हे गटाच्या नगरसेवकांना गुलाबातुन वेगळा वास येत होता आता या निकालाने कोणाची नाकेच खराब आहेत हे सिद्ध झाले आहे”-संदीप वर्पे,कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

कोपरगाव नगरपरिषदेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विविध रस्त्यांसह एकतीस कामे राजकीय कारणातून अडवून धरल्याने याबाबत वाद आता नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच जिल्हाधिकाऱ्यांकडे नेला होता.त्या बाबत नुकतीच सुनावणी पूर्ण झाली असून आज त्या बाबतचा निकाल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जाहीर केला आहे.त्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आज गौतम बँकेत पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यात हा भांडाफोड केला आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,नगरपरिषदेचे माजी गटनेते डॉ.अजय गर्जे,शिवसेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडियाल,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे,प्रतिभा शिलेदार,सौ.वाघचौरे,वर्षाताई गंगूले,नवाज कुरेशी,माजी नगरसेवक रमेश गवळी,अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद,संदीप पगारे,डॉ.तुषार गलांडे,आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी म्हटले आहे की,त्यांनी पुढे म्हटले आहे की,”वर्षांनुवर्षे कोपरगाव शहरातील कामे प्रलंबित ठेवण्याचे काम केले गेले होते.मात्र आ.आशुतोष काळे यांनी या कामाला आपल्या पक्षाची सत्ता नसताना गती दिली,त्याना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी साथ दिली आहे. मात्रविकास कामे न पाहवलेल्या कोल्हे गटाने मंजूर निविदा रद्द करण्याचा घाट घातला होता.तो आजच्या निकालाने उध्वस्त झाला आहे.व जनतेला अडविणाऱ्यांचा बंदोबस्त झाला आहे.या मुळें पालिकेचे मोठे नुकसान होणार होते.ते आता टळणार आहे.विकासाला खोडा घालणे कायद्याला हे अभिप्रेत नाही.मंजूर निविदा रद्द करण्याचा कोणालाही पाशवी बहुमताच्या जोरावर अधिकार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.बहुमताची मस्ती चांगली नसते जनहिताच्या कामांना विरोध करणे कोणालाही परवडणारे नाही”कोल्हे गटाच्या नगरसेवकांना गुलाबातुन वेगळा वास येत होता आता या निकालाने कोणाची नाकेच खराब आहेत हे सिद्ध झाले आहे”

या वेळी मंदार पहाडे,डॉ.अजय गर्जे,मेहमूद सय्यद,सपना मोरे,सुनील गंगूले,कलविंदर दडियाल,सपना मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर उपस्थितांचे आभार रमेश गवळी यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close