जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोपरगावसाठी चार कोटींचा निधी-नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगांव-(प्रतिनिधी)

नगर येथे संपन्न झालेल्या नगरविकास विभागाच्या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी कोपरगाव शहराला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ०४ कोटी रुपये देण्याचे तत्त्वतः मान्य केले असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

गेली चार वर्षे जाणीवपूर्वक राजकिय कारणाने कोपरगाव नगरपरिषदेला विकास निधी मिळू दिलेला नाही.निदान यावर्षी तरी कोपरगावसाठी भरीव विकास निधी मिळावा-नगराध्यक्ष विजय वहाडणे

अहमदनगर येथील नियोजन भवनात नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपरिषदेच्या विकास कामांबाबत आढावा बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील,कोपरगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,महापौर वाकळे व जिल्ह्यातील बहुसंख्य नगराध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी बोलतांना कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले कि,”गेली चार वर्षे जाणीवपूर्वक राजकिय कारणाने कोपरगाव नगरपरिषदेला विकास निधी मिळू दिलेला नाही.निदान यावर्षी तरी कोपरगावसाठी भरीव विकास निधी मिळावा.यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेशी चर्चा करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ०४ कोटी रुपये देण्याचे तत्त्वतः मान्य केले आहे.
त्याचबरोबर गोदावरी नदी संवर्धन-घाट सुशोभीकरण व शुकलेश्वर-कचेश्वर देवस्थानसाठी तीर्थक्षेत्र पर्यटन इ.साठी विकास निधी मिळावा अशीही आग्रही मागणी केली आहे. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी ५ क्रमांकाच्या साठवण तलाव व शहरातील रस्त्यांसाठी तसेच शहराच्या वाढीव भागाच्या विकासासाठी निधीची मागणी केली आहे. ना.एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लागणार असल्याने सर्वांनीच या आढावा बैठकीचे स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close