कोपरगाव तालुका
कोपरगावात पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका व शहर पोलीस ठाणे व डॉ.वाघाडकर,वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे परिसरात पोलीस कर्मचारी व पत्रकार आदीसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून ९० जणांनी त्या शिबिराचा लाभ घेतला असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
बंदोबस्ताच्या काळात पोलिसांचा दिवसेंदिवस कुटुंबासोबत भेट होत नाही या तुटलेपणाचा ताण अधिक येतो.पोलिसांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही सकारात्मक नाही.त्यामुळे समाजात आणि अंतर्गत व्यवस्थेमध्ये मिळणारी वागणूक पोलिसांना नैराश्यग्रस्त करते.त्यामुळे स्वतःला इजा करू घेण्याची शक्यता पोलिसांमध्ये बळावू शकते असे निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञ व्यक्त करतात.पोलिसांना गत काही वर्षांपासून काही संस्थांच्या वतीने आरोग्यतपासणी शिबिरे घेतली जातात-दौलतराव जाधव,पोलीस निरीक्षक,कोपरगाव तालुका पोलीस ठाणे.
राज्यातील पोलिसांना आठ तास कर्तव्याच्या वेळा ठरवून दिलेल्या असल्या तरीही आजही अनेक ठिकाणी पोलिसांना १२ तास कर्तव्यावर राहावे लागते.सार्वजनिक सण,समारंभ,मोर्चे,नेत्यांचे दौरे,शहरातील सुव्यवस्था राखण्याचा ताण पोलिसांवर येतो.वेळीअवेळी जेवण,पुरेशी झोप नसल्यामुळे पोलिसांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे.या लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब,मधुमेह या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.सतत उन्हात उभे राहिल्यामुळे डोकेदुखी बळावते.वेगवेगळ्या प्रकारची दुखणी मागे लागतात.अनेकदा ही दुखणी अनाठायी काळजीमुळे निर्माण झालेली असतात.पोलिसांसाठी काही रुग्णालयांमध्ये विशेष विमा योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरीही तिथे तपासणीसाठी यायलाही पोलिसांना वेळ मिळत नाही.त्यामध्ये शरीरात व्हिटॅमिन्सचा अभाव असणे,लोहाची कमतरता असणे,चेहऱ्यावर,हातापायांवर सूज असणे तसेच पोटाचे विकार,दम लागणे अशा तक्रारींचे प्रमाण अधिक असते.याला पत्रकारही अपवाद नाही याची गंभीर दखल घेऊन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस आणि पत्रकार आदींच्या आरोग्य शिबिराचे डॉ.वाघाडकर हॉस्पिटल व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस आदींच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.डॉ.राजेंद्र वाघाडकर व डॉ.संदीप मुरूमकर यांच्या सहकाऱ्यांनी आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी केली आहे.त्याला सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी व पत्रकार आदींनी प्रतिसाद दिला आहे.
प्रारंभी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी प्रतिमेचे पूजन करून शुभारंभ केला होता.तर उपस्थितांना संजय सातव,निरिक्षक दौलतराव जाधव
कार्यक्रमाचे प्रास्तविक पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले तर उपस्थितांना शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी मार्गदर्शन केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी मानले आहे.या शिबिरात जवळपास नव्वद पोलीस कर्मचारी व पत्रकार आदींनी प्रतिसाद दिला आहे.पोलीस अधिकाऱ्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.