जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बेशिस्त व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई राहणार सुरूच-मुख्याधिकारी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात कोपरगाव नगर पालिकेने प्लास्टिक वापरावर जप्तीच्या कारवाया केल्या.या कारवाया करताना पालिकेचे कर्मचाऱ्यांनी दुकानात घुसून त्यांनी अरेरावीची व दमदाटीची भाषा करून असभ्य वर्तन केल्याचा आरोप कोपरगाव व्यापारी महासंघाने केला असताना त्यास मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्याकडे कारवाईचे चलचित्रण उपलब्ध असल्याचे सांगून इन्कार केला आहे.व बेशिस्त व्यापारी यांच्या विरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्टपणे बजावले आहे.

कोपरगाव शहरांतील नागरिकांनी सरकारी मोहिमेला सहकार्य करणे गरजेचे आहे.आपले कर्मचारी कोणालाही नाहक त्रास देत नाही.व व्यापारी स्वतःहून प्लास्टिक काढून देत नाही त्यामुळे कारवाई अटळ बनते.शासन आदेशाचे पालन व्यापाऱ्यांनी केल्यास पालिका कोणालाही त्रास देणार नाही-प्रशांत सरोदे,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.

प्लास्टिकच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.विशिष्ट जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.तरीही या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे.विशिष्ट मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा पुन्हा वापर करता येत नाही.या पिशव्या वापरून झाल्यावर लोक त्या कुठेही टाकून देतात.परिणामी त्या गटारी,जलवाहिन्या आदीमध्ये त्या अडकून पाणी तुंबण्यासारखी समस्या निर्माण होते.पक्षी व जनावरांच्या पक्षांच्या पोटात त्या जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.अनेक वन्यप्रेमी तज्ज्ञांनी ते सप्रमाण सिद्ध केले आहे.प्लास्टिकच्या ९० टक्के बाटल्या या रिसायकल होतात.६० टक्के प्लास्टिक डम्पिंग ग्राउंडवर जाते त्याचाही पुनर्वापर होतो.हे खरे असले तरी या प्लास्टिक मुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे सरकारी निर्णयाची अंमलबजावणी कोपरगाव नगरपालिका करत आहे.त्यातून दोन दिवसापूर्वी पालिकेने विविध व्यापाऱ्यांवर कारवाई करत ५० ते ६० किलो एकलउपयोगी प्लास्टिक जप्त केले आहे.अनेक व्यापारी सूचना देऊन,ठराव करूनही प्लस्टिक आपल्या दुकानात विक्रीस ठेवत आहे.ते कायद्याचा आदर करत नाही हि गंभीर बाब आहे.त्यामुळे अनेक जीव मृत्यू पावत आहे.या दखल कोण घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.नागरिकांनी या सरकारी मोहिमेला सहकार्य करणे गरजेचे आहे.आपले कर्मचारी कोणालाही नाहक त्रास देत नाही.व व्यापारी स्वतःहून प्लास्टिक काढून देत नाही त्यामुळे कारवाई अटळ बनते असेही त्यांनी निदर्शनास आणले आहे.शासन आदेशाचे पालन व्यापाऱ्यांनी केल्यास पालिका कोणालाही त्रास देणार नाही असेही त्यांनी आश्वासन दिले आहे.व व्यापारी महासंघाच्या आरोपाचे खंडन केले आहे.त्यामुळे हा वाद थांबणार की पुढे आणखी वाढणार हे लवकरच समजणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close