गुन्हे विषयक
शेकोटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी,सहा जण जखमी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत ग.क्रं.३५९ मध्ये शेकोटी करण्याच्या कारणा वरून दोन गटात बांबू-काठीने झालेल्या हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झाले असून या हाणामारीतील दोन्ही गटातील एकमेकांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
फिर्यादी राजेंद्र बाजीराव जाधव (वय-४६) यांची मुले शेकोटी करून शेकत असताना यातील आरोपी संजय महाले व अमोल संजय महाले,निलेश संजय महाले सर्व रा.सांगवी भुसार हे त्या ठिकाणी आले व त्यांनी आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिव्या देण्यास सुरुवात केली.त्या नंतर फिर्यादीची पत्नी वंदना जाधव हिने सदरची घटना आपला सासरे,दिर यांना फोनवरून सांगितली.त्यानंतर हि धुमश्चक्री उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,सांगवी भुसार या गोदावरी काठी वसलेल्या गावात राजेंद्र बाजीराव जाधव व विरोधी गटाचे संजय मनोहर महाले हे दोन कुटुंब शेजारी-शेजारी राहतात.थंडीचा कडाका वाढला असल्याने नागरीकांची शेकोटी भोवती गर्दी स्वाभाविकपणे वाढत चालली आहे.त्याला सांगवी भुसार गावातील ग्रामस्थही व तरुणही अपवाद नाही.दोन्ही कुटुंब शेजारी-शेजारी राहत असल्याने फिर्यादी राजेंद्र बाजीराव जाधव (वय-४६) यांची मुले शेकोटी करून शेकत असताना यातील आरोपी संजय महाले व अमोल संजय महाले,निलेश संजय महाले सर्व रा.सांगवी भुसार हे त्या ठिकाणी आले व त्यांनी आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिव्या देण्यास सुरुवात केली.त्या नंतर फिर्यादीची पत्नी वंदना जाधव हिने सदरची घटना आपला सासरे,दिर यांना फोनवरून सांगितली.त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीचे वडील व भाऊ घटनास्थळी आले असता आरोपींना समजावून सांगत असता आरोपी संजय मनोहर महाले,अमोल मनोहर महाले,निलेश संजय महाले यांनी फिर्यादी जाधव यांना शिवीगाळ दमदाटी करून बांबू व काठीच्या सहाय्याने व लाथा बुक्य्यांनी मारहाण केली आहे.या वरून हा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेत राजेंद्र जाधव,काकासाहेब बाजीराव जाधव,बाजीराव शंकर जाधव आदी तीन जण जखमी झाले आहे.
दुसऱ्या फिर्याद निलेश संजय महाले यांनी दाखल केली आहे.त्यात त्यांनी आरोपी राजेंद्र बाजीराव जाधव,काकासाहेब बाजीराव जाधव,बाजीराव शंकर जाधव आदी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यात त्यांनी आपले वडिल संजय महाले यांनी आरोपीच्या मुलांना शेकोटी करण्यास मज्जाव केला असता त्यांना समजावून सांगता असता आरोपी राजेंद्र जाधव,काकासाहेब जाधव,बाजीराव जाधव यांनी फिर्यादीचे वडील व भाऊ यांना शिवीगाळ करून दमदाटी केली व लाथा बुक्य्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे.व लाकडी दांडक्याने अमोल संजय महाले,यांचे डोक्यावर व हातावर मारहाण करून हात मोडला असून गंभीर दुखापत केली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४७ व ४८/२०२१,भा.द.वि.कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६.३४ अन्वये दोन्ही गटाच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रभाकर काशीद हे करीत आहेत.