जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

चांदेकसारेत शेळी,बोकडांची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीतील झगडे फाटा येथील रहिवाशी असलेल्या विलास भाऊसाहेब होन (वय-४२) यांच्या घरानजीक बांधलेल्या शेडमध्ये सुरक्षित असलेला अकरा हजार रुपये किंमतीचे एक शेळी व एक बोकड असा ऐवज अज्ञात चोरट्याने मंगळवार दि.१९ जानेवारीच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास पाळत ठेऊन लंपास केल्याने नजीकच्या पशु पालकांत खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या घराचे नजीक जनावरांसाठी बांधलेल्या शेडमध्ये त्यांनी पाच हजार रुपये किमतीची आपली एक बांड्या रंगाची पाच महिने वयाची शेळी सहा हजार रुपये किमतीचा रंगाने काळा डोक्यावर पांढरा ठिपका तसेच लांब कान असलेला बोकड आदी बांधून ठेवले होते व ते नेहमीप्रमाणे झोपी गेले असता सकाळी उठून त्यांनी आपल्या शेडमधील शेळी व बोकड आदींचा आढावा घेतला असता त्या ठिकाणी ते आढळून आले नाही.त्यांच्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी विलास होन हे वरील गावचे रहिवाशी असून ते शेती व्यवसाय करतात.त्यांचेकडे आपल्या घराचे नजीक जनावरांसाठी बांधलेल्या शेडमध्ये त्यांनी पाच हजार रुपये किमतीची आपली एक बांड्या रंगाची पाच महिने वयाची शेळी सहा हजार रुपये किमतीचा रंगाने काळा डोक्यावर पांढरा ठिपका तसेच लांब कान असलेला बोकड आदी बांधून ठेवले होते व ते नेहमीप्रमाणे झोपी गेले असता सकाळी उठून त्यांनी आपल्या शेडमधील शेळी व बोकड आदींचा आढावा घेतला असता त्या ठिकाणी ते आढळून आले नाही.दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी आपली हात की सफाई दाखवली असल्याचे निष्पन्न झाले आहे.याबाबत त्यांनी आजूबाजूस असलेल्या शेतकरी व ग्रामस्थ यांचेकडे चौकशी केली असता ते मिळून आले नाही.त्यामुळे ते हैराण झाले अखेर कंटाळून त्यांना झाल्या घटनेचा अंदाज आला व त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close