जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेची वर्षाला होणार २५ लाखांची बचत

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

भारत सरकारच्या पथदिवे राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत (एस.एल.एन.पी.) कोपरगाव नगरपरिषदेने शहरातील विविध रस्त्यांवर आतापर्यंत ४ हजार २५९ पथदिवे लावल्याने आतापर्यंत वीज वापरात प्रतिमाह ४.२० लाख ते ४.८५ लाखांचे बिल आता किमान पातळीवर येऊन ते आता किमान २.८० ते ३.५० लाख रुपयांवर येऊन प्रतिवर्ष नगरपरिषदेच्या विद्युत बिलात आता २५ लाख रुपयांची बचत होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.याबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,विद्युत अभियंता रोहित सोनवणे यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

“सरकारने नक्कीच चांगला निर्णय असून यातून नगरपरिषदेच्या तिजोरीवरील मोठा भर कमी होणार असून यातून नवीन दिवे लावणारी एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस ली.हि कंपनी यांचेशी सात वर्षाचा करार केला आहे.त्यांनी वेळेत काम पूर्ण करत आणले आहे”-विजय वहाडणे,अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

राज्य शासनाचे ऊर्जा संवर्धन धोरणांवये २२ जून २०१७ नुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या कार्यक्षेत्रात ई.ई.एस.एल.च्या माध्यमातून एस्को तत्वावर बसविण्यासाठी करारनामा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.व त्या निर्णयानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पारंपरिक विद्युत दिव्यांच्या जागी एल.ई.डी.दिवे बसविणे बंधनकारक केले आहे.त्यामुळे याबाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी याबाबत पुढाकार घेऊन कोपरगाव नगरपरिषद हद्दीत सर्व पारंपरिक पथदिव्यांच्या जागी नवीन ऊर्जा बचत करणाऱ्या एल.ई.डी.दिवे बसविण्याच्या योजनेस गत वर्षी एप्रिल २०१९ मध्ये सुरुवात केली होती.या योजनेतून पालिकेने आतापर्यंत ४ हजार ८०० पैकी ४ हजार २५९ एल.ई.डी. दिवे बसविले आहे.परिनाम स्वरूप शहरातील विजेत सुमारे २.८० लाखांपासून ३.५० लाखांपर्यंत बचत होऊ लागली आहे.त्यातून वर्षाला जवळपास पंचवीस लाखांची बचत होणार आहे.या योजनेसाठी केंद्रसरकार ९० टक्के अनुदान देत असून उर्वरित निधी नगरपरिषदेने पंधराव्या वित्त आयोगातून करावयाचा असून हि योजना अंतिम टप्यात आली आहे.

याबाबत शहर विद्युत अभियंता रोहित सोनवणे यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी,”शहरात पालिकेने १८,२४,३५,७०,व १९० वॅटचे दिवे लावले आहे.पारंपरिक विदयूत दिव्यांपेक्षा एल.ई.डी. दिवे हे ९० टक्के ऊर्जेची बचत करत असल्याने यातून नगरपरिषेच्या विद्युत बिलात मोठी बचत होत आहे.यातून नगरपरिषदेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे”.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close