कोपरगाव तालुका
“डी स्पेस” डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअर उपयुक्त-माहिती
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“डी स्पेस डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअर हे उच्च शिक्षण क्षेत्रात सध्या कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक संशोधक व विद्यार्थी अधिक घटकांसाठी अत्यंत उपयोग सॉफ्टवेअर आहे त्याच्या माध्यमातून प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनींनी लिहिलेले शोध निबंध,शोध प्रबंध,संशोधनपर ग्रंथ आदी सामग्री विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होऊ शकेल,”असे प्रतिपादन सोफ्टेक सोल्युशन अँड सर्विस चे कार्यकारी संचालक चेतन टाकसाळे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“डी स्पेस सॉफ्टवेअर हे एक अद्यावत सॉफ्टवेअर असून सध्याच्या डिजिटल युगातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे.या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना अभ्यास साहित्य सहज उपलब्ध होणार असल्याने सर्व प्राध्यपकांनी याचा लाभ घ्यावा”-चेतन टाकसाळे
कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.संतोष पगारे हे होते.
सदर प्रसंगी पुढे म्हणाले की,”डी स्पेस सॉफ्टवेअर हे एक अद्यावत सॉफ्टवेअर असून सध्याच्या डिजिटल युगातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे.या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना अभ्यास साहित्य सहज उपलब्ध होणार असल्याने सर्व प्राध्यपकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो.या प्रसंगी श्री.टाकसाळे यांनी सदर सॉफ्टवेअरचा वापर कसा करावा हे ही प्रात्यक्षिकासह समजावून या प्रशिक्षणासाठी डॉ.के.एल.गिरमकर (प्रमुख कला शाखा),प्रा.ठाणगे (प्रमुख आय.क्यू.ए.सी.)डॉ.जी.के.चव्हाण,पाचोरे एस.ए.यांची विशेष उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन ग्रंथपाल श्रीमती नीता शिंदे यांनी केले.या प्रशिक्षणाचा वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी उपस्थिती दर्शवून लाभ घेतला.