जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सोमैय्या महाविद्यालयात नोकरी शिबिरात ३६ विद्यार्थ्यांची निवड

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव स्थानिक के.जे.सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि रुरल शोर्स प्रा.लि. कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बजाज फायनान्स या कंपनीसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये महाविद्यालयाच्या एकूण ३६ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली आहे.

प्राचार्य डॉ. बी. एस. यादव पुढे म्हणाले की, “आमच्या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत शनिवार, दिनांक १६ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ९.३० वा. या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी दिलेल्या पूर्व सूचनेनुसार ६४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी ३६ विद्यार्थ्यांची बजाज फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अंतिम निवड केली.” “महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत वर्षभर विविध कंपन्यांच्या सहकार्याने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येत असते. यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत,” असेही डॉ. यादव म्हणाले. को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव. ऍड. संजीव कुलकर्णी व सदस्य मा. संदीप रोहमारे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनासोबतच जी. पी. एफ., ग्रॅचुटी, तसेच मेडिकल या सुविधाही पुरविल्या जाणार असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. संतोष पगारे यांनी दिली. कॅम्पस इंटरव्ह्यूच्या यशस्वीतेसाठी प्रा. व्ही. सी. ठाणगे व डॉ. जी. के. चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करून या मुलाखती संपन्न झाल्या, अशी माहिती कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी दिली.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close