कोपरगाव तालुका
कोल्हे गटाने विकास कामे रोखल्याने राष्ट्रवादीची जनजागृती फेरी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील विकासकामांच्या निविदा कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी नामंजूर केल्यामुळे शहर विकासाचा झालेला खोळंबा तमाम शहरातील नागरिकांच्या निदर्शनास आणून देऊन कोल्हे गटाचे नगरसेवक विकासाच्या बाबतीत किती उदासीन आहेत हे दाखवून देण्यासाठी शनिवार (दि.१६) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस,शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस,मनसे व आदी मित्र पक्षांच्या वतीने कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यावरून जनजागृती फेरी काढण्यात आली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी आगामी नगरपरिषद निवडणूक डोळयांसमोर ठेऊन आपला व्हेटो वापरून शहर विकासाची सोळा कामे फेटाळून लावल्याने वादाची ठिणगी पडली आहे.त्यावरून वातावरण शहरात ढवळून निघाले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत कोपरगाव शहरातील विविध विकास कामांच्या निविदा सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केल्या आहे.त्यामुळे या विकासकामाचा कोपरगाव शहरातील ज्या हजारो नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा झाला असता तो आता होणार नाही. सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विकास न करण्याची वृत्ती जोपासून शहरातील नागरिकांवर अन्याय केला आहे.याची माहिती शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या सर्वपक्षीय जनजागृती फेरीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी शहर विकासात घातलेल्या आडकाठीमुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असल्याच्या भावना नागरिकांनी या जनजागृती फेरी दरम्यान व्यक्त केल्या आहे.
या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,प्रतिभाताई शिलेदार,मेहमूद सय्यद,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,राजेंद्र वाकचौरे,फकीर कुरेशी,रमेश गवळी,भरत मोरे,दिनकर खरे,राहुल देवळालीकर,वाल्मिक लहिरे,संदीप देवळालीकर,रावसाहेब साठे,संदीप कपिले,अशोक आव्हाटे,गणेश लकारे,राजेंद्र खैरनार,चंद्रशेखर म्हस्के,बाळू सोळुंके,राजेंद्र जोशी,एकनाथ गंगूले,विशाल चवंडके,विजय दाभाडे,इम्तियाज अत्तार,विजय नागरे,रश्मीताई कडू,सारिका मोरस्कर,लक्ष्मण आमले,समीर वर्पे,ऋषिकेश खैरनार,नारायण लांडगे,कार्तिक सरदार,संतोष शेजवळ,विकी जोशी,तेजस साबळे,संतोष दळवी,विकास शर्मा,राहुल चवंडके,रशीद शेख,शफीक शेख,स्वप्नील घुगरे,अशोक लांडगे,आकाश डागा,सजीत शेख,आकाश कानडे,रवींद्र राऊत,योगेश नरोडे,दादा पोटे,हर्षल जैस्वाल,रोशन शेजवळ,युसूफ शेख,पप्पु सय्यद,सरजिल शेख,वसीम शेख,अरबाज सय्यद,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.