कोपरगाव तालुका
भुमीपूजनाचा फलक फाडला,शहर राष्ट्रवादीने केला निषेध
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील साडे अठरा लाख रुपये खर्चाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आला होता त्या फलकाची अज्ञात आरोपींनी रात्रीतून नासधूस केली असून याचा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे व अन्य पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करून या असामाजिक तत्वांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आपल्याला फलक फाडल्याचे अजिबात आश्चर्य वाटलेले नाही.कारण विकास कामे सुरु केली की काही पक्षांच्या नेत्याना पोटदुखी सुरु होते.त्यातूनच पाच क्रंमाकाच्या तलावाचे काम आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदाराने सुरु केले होते.त्यावेळी काही विघ्नसंतोषी नागरिकांनी ठेकेदारांच्या जेसीबी व अन्य वाहनाचे नुकसान करून आपली लायकी दाखवून दिली होती.त्यांनीच हा प्रकार केला असला पाहिजे-नगराध्यक्ष विजय वहाडणे,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहरात नुकताच सर्वसाधारण रस्ता अनुदान अंतर्गत कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर काँक्रिटीकरण व प्रभाग क्रमांक सहा मधील नाथाभाऊ घर ते राममंदिरापर्यंत डांबरीकरण करणे या कामांचा शुभारंभ नुकताच मोठा गाजावाजा करून आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आला होता.त्या वेळी त्यानी एका हिरव्या रंगाच्या फलकाचे अनावरण केले होते.त्या फलकावर काही असामाजिक तत्वांची वाकडी नजर पडली असून त्यांनी रात्रीतून हा फलक फाडून टाकला आहे त्याचे पडसाद उमटले असून या गंभीर दखल राष्ट्रवादीच्या शहर व तालुका कार्यकर्त्यानी घेतली आहे.व त्याबाबत पोलिसांना खबर दिली असून या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.सकाळी हि बाब काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिली असता घटनास्थळी शहरातील कार्यकर्त्यानी धाव घेतली आहे व याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले असता त्यांनी या प्रकरणी शोध घेऊन कारवाईचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान या घटनेबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे कॉंक्रिटीकरणाचे काम नुकतेच केले होते.ज्या नागरिकांना शहर विकास हवा आहे.ते असे संतापजनक काम करू शकत नाही.मात्र ज्या शक्तींचा विकास कामांना विरोध आहे.त्याचेच हे काम आहे.आता आ.आशुतोष काळे यांच्या विकास कामाला विरोध केला तर उद्या पाच क्रमांकाच्या तलावाचे काम झाल्यावर हे इसम त्या ठिकाणी तलावात उड्या मारतील का ? असा खोचक सवाल करून अधिकारी बदलावर शहरात अस्वस्थता व गुन्हेगारीचा वाढणारा आलेख का निर्माण झाला ? याला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करून याबाबत कोपरगाव शहर पोलिसानी गंभीर दखल घेऊन आरोपींवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा दिला आहे.
याबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,”आपल्याला फलक फाडल्याचे अजिबात आश्चर्य वाटलेले नाही.कारण विकास कामे सुरु केली की काही पक्षांच्या नेत्याना पोटदुखी सुरु होते.त्यातूनच पाच क्रंमाकाच्या तलावाचे काम आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदाराने सुरु केले होते.त्यावेळी काही विघ्नसंतोषी नागरिकांनी ठेकेदारांच्या जेसीबी व अन्य वाहनाचे नुकसान करून आपली लायकी दाखवून दिली होती.त्यांनीच हा प्रकार केला असला पाहिजे असा संशय व्यक्त केला आहे.व गत चार वर्ष ज्यांनी शहर विकासाला विरोध केला त्यानींच हा कारभार केला असल्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
सदर वेळी शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी तर ज्या विरोधकांचे नावे फलकावर आहे त्याला धक्का लावलेला नाही फक्त आ.आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नावानेच वावडे झालेले दिसत असल्याचा आरोप केला असून हे कारस्थान विरोधकांचे असल्याचा संशय व्यक्त केला आहे.