जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सार्वजनिक सौचालये हि नैसर्गिक गरज-नगराध्यक्ष

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील अनेक प्रभागातील काही सार्वजनिक शौचालये,स्वच्छता गृहे (मुताऱ्या) यांची तोडफोड करून काही असामाजिक तत्त्वांनी सार्वजनिक मालमत्तेची वाट लावली असून या प्रवृत्ती शहरासाठी विघातक असून हि सर्वांची नैसर्गीक गरज आहे.त्यामुळे या अपप्रवृत्तीवर सर्वांनी लक्ष ठेवणे गरजेचे असल्याने शहरातील सुज्ञ नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

शहरातील प्रतीक्षास्थळे,प्रमुख बाजारपेठ,प्रदर्शन हॉल,खरेदीमेळा,खुले सभागृह,मैदान,रॅली,मोर्चाचा कायमस्वरूपी मार्ग याठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह असलेच पाहिजे असे म्हटले आहे.कोपरगावात अद्याप बऱ्याच ठिकाणी सौचालये व मुताऱ्यांची आवश्यकता आहे.मात्र याबाबतीत नगरपरिषद कमी पडत असून त्याला निव्वळ एकच बाजू नाही तर नागरिकही जबाबदार आहे.

भारतीय महिलांच्या स्वच्छतागृहांबाबतच्या गरजा व सुविधांसंदर्भात इंडियन बिल्डिंग काँग्रेस या संस्थेने पाहणी करून एक अहवाल तयार केला होता. या अहवालात किमान सुविधा काय असाव्यात, हे नमूद करण्यात आले आहे.यामध्ये प्रतीक्षास्थळे,प्रमुख बाजारपेठ,प्रदर्शन हॉल,खरेदीमेळा,खुले सभागृह,मैदान,रॅली,मोर्चाचा कायमस्वरूपी मार्ग याठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह असलेच पाहिजे असे म्हटले आहे.कोपरगावात अद्याप बऱ्याच ठिकाणी सौचालये व मुताऱ्यांची आवश्यकता आहे.मात्र याबाबतीत नगरपरिषद कमी पडत असून त्याला निव्वळ एकच बाजू नाही तर नागरिकही या आवश्यक गरजेकडे गांभीर्याने पाहत नाही हि मोठी शोकांतिका आहे.यावर नेमके बोट अध्यक्ष विजय वहाडणे यांनी ठेवले आहे.

कोपरगाव शहरातील काही शौचालयाचे दरवाजे,भांडी,लाईट,नळ यांचे नुकसान काही चुकीच्या प्रवृत्ती करत आहेत,चोऱ्याही होतात.अनेकदा दुरुस्ती करूनही वारंवार असे प्रकार घडत आहेत.दारूच्या बाटल्या,विटकरीचे तुकडे,प्लास्टिक,घुटक्याच्या पुड्या टाकल्याने गटारी तुंबतात,काही डुकराचे मालक जाणीवपूर्वक ड्रेनेज फोडतात.स्वच्छतेसाठी,आरोग्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी,पदाधिकारी सातत्याने प्रयत्न करत असतात.तरीही असे गैरप्रकार घडत आहेत.नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करूनही असे घडणे योग्य नाही.अनेक प्रभागात स्त्री व पुरुषांच्या सोयीसाठी “स्वच्छता गृहे” उभारायची आहेत,पण त्यासाठी जागा मिळत नाहीत.स्वच्छता गृह हवे पण “आमच्या जवळ-समोर-शेजारी नको”असे अनेकांचे म्हणणे नविन स्वच्छता गृह बनविता येत नाही,हेही सर्वांनी लक्षात घ्यावे.हे शहर आपले आहे,संपुर्ण शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्वांनी जबाबदारीने सहकार्य करणे आवश्यक आहे.घंटागाड्या असूनही कचरा कुठेही फेकणारे शहराचे आरोग्य धोक्यात आणताहेत.ओला सुका कचरा वेगवेगळा करूनच घंटागाड्यात टाकावा असे आवाहन अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.व नागरिकांनी सुचविल्यास नवीन जागी नगरपरिषद नवीन सौचालये बांधण्यास तयार असल्याचेही त्यानी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close