जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव या वर्षीही स्वच्छ सर्वेक्षण अभियानात

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

२ ऑक्टोबर २०१४ पासून केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविले जात आहे.या अभियानामध्ये देशभरातील सर्व नगरपरिषद यांचा सहभाग वाढत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदाची स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा देशपातळीवर २०१६ पासून घेतली जात आहे. कोपरगाव नगरपरिषदेने देखील या स्पर्धेत दरवर्षी सहभाग नोंदविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये या स्पर्धेत देशातील पश्चिम विभागातील पाच राज्यातील पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या एकूण १८७ नगरपरिषदांपैकी कोपरगाव नगरपरिषदेने ६००० गुणापैकी एकूण ३८७३.०३ इतक्या गुणांसह देशात १८ वे, राज्यात १७ वे तर नाशिक विभागात १६ वे मानांकन प्राप्त केले आहे.या वर्षीही स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सहभाग घेतला आहे. त्या अंतर्गत शहरातील स्वच्छतेच्या बाबत विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.ज्यात नागरी भागात दैनंदिन स्वच्छता,व्यापारी भागात दररोजची दैनंदिन दोन वेळा स्वच्छता,त्याचबरोबर जमा होणारा ओला,सुका व घातक कचरा १०० टक्के घरोघरी जाऊन घंटागाडीने जमा केला जातो.जमा झालेला ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा वेगवेगळा घंटागाडीमध्ये घेतला जातो.
यापूर्वी मनाई येथिल घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मध्ये वर्षानुवर्षे जमा झालेले कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणावर होते.त्यापरीसरात दुर्गंधी,काटेरी झुडपे यामुळे परिसरात साप,विंचू इ.प्रमाण वाढल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. सदर परिसराची नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी पाहणी करून दखल घेवून सदर ठिकाणचा कायापालट करण्यासाठी संबंधितांना सूचना केल्या होत्या.मनाई येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे जमा झालेले कच-याचे ढीग यावर बॅायोमायनिंग प्रक्रिया करून सदर कच-याचे ढीगा मधील प्लॅस्टिक वेगळे केले आहे. त्या ठिकाणच्या कच-याची चाळणी करून तेथील ढीग नष्ट केले आहे.
आज रोजी शहरातील जमा झालेला कचरा घंटागाड्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे नेवून ओला कचरा यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. कंपोस्ट खत निर्मिती पन्नास टन क्षमतेचे प्रकिया केंद्र कार्यान्वित आहे.ओला कचरा यातील इतर काही कचरा आला असेल तर तो वेगळा केला जातो.त्यावर बायोकल्चर,पाणी नियमितपणे त्याला एकत्रित करून सदर ओला कचरा पंचेळीस दिवसापर्यंत त्यावर प्रक्रिया केली जाते.
त्यानंतर त्याला मशीन द्वारे चाळून कंपोष्ट खत तयार होते. तयार झालेली कंपोस्ट खत हे शहरातील उद्यान,झाडे यांना टाकून व उर्वरित शेतकऱ्यांना रु.दोन हजार प्रती ट्राली प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात आहे.
सुका कचरा हा एम.आर.एफ.केंद्र या ठिकाणी असलेल्या कचराडेपो मध्ये वेगळा केला जातो. त्यामध्ये काच, पुष्टा, कापडचिंधी,प्लास्टीक, लोखंड आदी बाबी वेगवेगळ्या करून ठेवल्या जातात व त्यानुसार त्याबाबत विक्रीसाठी विविध कंपन्यांसोबत करार करून विक्री केली जाते.
शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम व त्या ठिकाणी तयार होणारा बांधकामाचं वेस्ट मटेरियल जसे विटाचा भुगा,रेती,काँक्रीट,(रॅबिट) आदी जमा करून कचराडेपो येथील सी अँड डी वेस्ट याठिकाणी जमा केला जातो.तो वेगळा ठेवला जातो.त्याचा पुनर्वापर आवश्यकते नुसार इतर कामांमध्ये वापर करण्यात येतो.
कोपरगाव नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण,हगणदारी मुक्त, कचरामुक्त शहर याकामी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे नेतृत्वाखाली व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोरडे सर्व विभाग प्रमुख,सर्व अधिकारी कर्मचारी मेहनत घेत आहे.तसेच याकामी वेळोवेळी सर्व उपाध्यक्ष स्वप्नील निखाडे,आरोग्य सभापती अनिल आव्हाड सर्व पदाधिकारी,नगरसेवक,नगरसेविका यांचा सक्रीय सहभाग असल्याचे सांगितले आहे.
मनाई घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या ठिकाणी कचरा प्रकिया करणे कामी आराखड्यानुसार शेडचे बांधकाम प्रस्तावित असून अभियंता दिगंबर वाघ यांच्या देखरेखेखाली करत आहे.कोविड १९ कालावधीत कोरोना संसर्ग नियंत्रणात कामी घरोघरी फवारणी,सार्वजनिक ठिकाणी फवारणी,स्वच्छता,मास्क ण वापरणा-या नागरीका विरोधी दंडात्मक कार्यवाही,कोरोना मयत रुग्णांचा अंत्यविधी इ.कामे करून यासह कोपरगाव शहर स्वच्छतेसाठी प्र.आरोग्य निरीक्षक सुनील आरण यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेचे सर्व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहे.
कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की,आपल्या शहराचा स्वच्छ सर्वेक्षण मधील आपली गुणवत्ता सुधारण्यासाठी आपआपला कचरा वेगवेगळा करूनच घंटागाडी मध्ये द्यावा. तसेच शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने जर आपल्या काही संकल्पना, विचार असेल तर त्या आपण प्रत्यक्ष भेटून कळवावे व आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close