कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात रुग्णवाढ थांबेना !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ६० अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०७ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी ४५ स्राव पाठवले आहे.तर तेथून ०१ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहे.खाजगी प्रयोग शाळेतील एकही अहवाल बाधित आला नाही.आज एकूण ०८ जण बाधित आले आहे.तर आधी भरती असलेल्या १९ रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६५ हजार ३७७ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९६९ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ४२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात ०३ रुग्ण बाधित आढळले आहे.त्यात साईनगर येथील एक पुरुष वय-६१,निवारा एक महिला वय-४८,गजानननगर एक पुरुष वय-३५,आदी रुग्णांचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागात तालुक्यात पाच रुग्ण बाधित आढळले असून त्यात संवत्सर हद्दीत दोन रुग्ण त्यात एक महिला वय-५०,एक पुरुष वय- २० बाधित आढळला आहे.चास नळी येथे तीन पुरुष वय-६२,३५,६२, बाधित आढळले आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ५४९ इतकी झाली आहे.त्यात ६६ रुग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे आज पर्यंत ४२ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६४ टक्के आहे.आतापर्यंत १७ हजार ८८४ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ७१ हजार ५३६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १४.२५ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार ४४१ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९५.७६ टक्के झाला आहे.दरम्यान आज शहरी भागात आज रुग्ण वाढ रोखली असल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.