आरोग्य
कर्मचारी बाधित येऊनही शाळेत कार्यरत,पालकांत खळबळ !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात शाळा सुरु होवून काही दिवस उलटत नाही तोच पुणतांबा चौफुली नजीक पूर्व बाजूस हाकेच्या अंतरावर असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या एक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा स्राव बाधित येऊनही शाळेत तब्बल दोन दिवस काम सुरु ठेवल्याने पालकांत व विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
या बाबतांच्या प्रतिनिधीने संस्थेच्या प्राचार्यांनी संपर्क साधला असता त्यांच्या शाळा प्रशासनाच्या प्रामुख्याने या बाबीला दुजोरा दिला आहे.व याबाबत आरोग्य विभागाला दोष लावला आहे.त्यांनी दिलेल्या माहिती नुसार शाळेतील २४ कर्मचाऱ्यांचे श्राव हे आरोग्य विभागाने २५ नोव्हेम्बर रोजी नेले होते.मात्र ते लगेच देणे आवश्यक असताना आरोग्य विभागाने ते तब्बल नऊ दिवसांनी दि.०४ डिसेंम्बर रोजी दुपारी १२ वाजता दिल्याने त्यात आमचा दोष नाही-प्राचार्य
कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ५४१ इतकी झाली आहे.त्यात ७७ रुग्ण सक्रिय आहेत.त्यामुळे आज पर्यंत ४२ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६५ टक्के आहे.आतापर्यंत १७ हजार ७७९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ७१ हजार ११६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १४.२९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार ४२२ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९५.३१ टक्के झाला आहे.कोपरगाव तालुक्यात वर्तमान काळात कोरोनाने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून दररोज रुग्णांचे उच्चान्क वाढताना दिसत असल्याने नागरिक,पालकांत व विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.अशातच सरकारने शाळा सुरु करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे.२३ नोव्हेंबरपासून नववी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील शाळा,महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मात्र या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर येणार नाही ना ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.शाळांमध्ये पालकांच्या लेखी संमतीने पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याने शाळांची स्वच्छता,नियमित प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी,दोन व्यक्तीतील सुरक्षित अंतर या सर्व गोष्टींचं पालन करण्यात यावं तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील देखील शाळा सुरू होणार असल्याने या भागातही कोविड बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.मात्र या सूचनांचे पालन खरेच होते का ? हा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याचे धक्कादायक उदाहरण नुकतेच समोर आले असून त्यामुळे पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.पुणतांबा चौफुली नजीक पूर्वबाजूस हाकेच्या अंतरावर एक इंग्रजी माध्यमाची केंद्रीय माध्यमिक शाळा असून त्या शाळेलाही इतर शाळाप्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असताना त्या पूर्वी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोनाची वैद्यकीय तपासणी करुनच प्रवेश करुनच पुढील प्रक्रिया करण्याची ग्वाही दिली असताना येथील शिक्षकेतर एका कर्मचाऱ्याने दोन दिवस शाळेत प्रवेश करून आपले कामकाज सुरु ठेवले होते.या बाबत पालक व संबंधित सहकाऱ्यांना हि बाब तेंव्हा लक्षात आली जेंव्हा आरोग्य विभागाने दूरध्वनी करून या शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल बाधित आला व ते विलगीकरण झाले किंवा नाही याची दूरध्वनीवरून खातरजमा केली.त्यावेळी हे महाशय आपण नाशिकला आहे असे सांगत होते.मात्र त्याची खात्री करण्यासाठी त्यांनी शाळेत फोन करून खात्री केली असता ते शाळेत हजर राहून आपले कर्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला व त्यांनी तत्काळ यावर कारवाईसाठी त्या शाळेतील अन्य प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी हे कर्मचारी शाळेत हजर असल्याचे सांगितले आहे.व त्यानंतर त्यांनी या त्याच फोनवरून कारकून दर्जाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता त्याने आपण कामावर असल्याचे सांगितले व त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची चांगलीच कानउघडणी केली व त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये केली आहे.त्यामुळे हा प्रश्न तात्पुरता मिटला असला तरी अशा बेजाबदार पद्धतीने जर शाळा व्यवस्थापनाने काम केले तर कोरोना वाढण्यास उशीर लागणार नाही.त्यामुळे पालकांची मोठी नाराजी वाढली आहे.याची प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करायला हवी अशी मागणी पुढे आली आहे.तरच विद्यार्थ्यांचा आगामी काळ सुरक्षित राहील असे मानले जात आहे.
दरम्यान या संस्थेच्या प्राचार्यांनी संपर्क साधला असता त्यांच्या शाळा प्रशासनाच्या प्रामुख्याने या बाबीला दुजोरा दिला आहे.व याबाबत आरोग्य विभागाला दोष लावला आहे.त्यांनी दिलेल्या माहिती नुसार शाळेतील २४ कर्मचाऱ्यांचे श्राव हे आरोग्य विभागाने २५ नोव्हेम्बर रोजी नेले होते.मात्र ते लगेच देणे आवश्यक असताना आरोग्य विभागाने ते तब्बल नऊ दिवसांनी दि.०४ डिसेंम्बर रोजी दुपारी १२ वाजता दिल्याने त्यात आमचा दोष नसल्याचे म्हटले आहे.त्याबाबत आपण आरोग्य विभागातील एका वरिष्ठ महिला डॉक्टरांशी बोललो होतो.व त्यांनी त्याची दाखल न घेतल्याचा आरोप केला आहे. व अहवाल आल्यावर आपण तात्काळ त्या कर्मचाऱ्यास कोपरगाव येथील कोविड सेंटरला उपचारार्थ भरती केले होते व ते आता पूर्ण बरे झाल्याचा दावा केला आहे.त्यामुळे यात नेमके खरे कोणाचे मानायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.