जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पयीन मुलगी बेपत्ता,कोपरगावात गुन्हा दाखल,सर्वत्र खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी अज्ञात आरोपीने पळवून नेली असल्याची फिर्याद मुलीच्या आईने (वय-३५) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चोरी-दरोड्याप्रमाणे आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पालक आणि पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून,फूस लावून पळवून नेण्याच्या महिन्यात किमान तीन-चार घटना कोपरगाव शहर आणि तालुक्यात घडत आहेत.विशेष म्हणजे या अपहरणांमध्ये परिचयातील किंवा परिसरातील तरुणांचा समावेश सर्वाअधिक असल्याचे वांरवार उघड होत आहे.

जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलीस देखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.अशीच घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वायव्य भागात घडली आहे.कोपरगाव तालुक्यातही अशा घटनात मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे पालकांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.त्यातच लव्ह जिहाद प्रकरणी संगमनेर येथील घटना ताजी असताना चिंता व्यक्त होत आहे.

सदर बेपत्ता मुलगी (वय वर्ष-१३) हि शनिवार दि.१७ जून रोजी सायंकाळी ७.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहे.तिच्या पालकांच्या कायदेशीर राखवालीतून अज्ञात कारणासाठी तिला पळवून नेले आहे.तिचा मजबूत बांधा असून तिची उंची ५ फूट ५ इंच आहे.तिच्या अंगात गुलाबी रंगाचा लाल टॉप आहे.लाल रंगाची लेगीन्स,पायात साधी चप्पल आहे.कोणास सापडल्यास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले आहे.

दरम्यान या प्रकरणी सदर महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदींनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी महिलेचा जबाब नोंदवून गुन्हा क्रं.३०८/२०२३ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close