कोपरगाव तालुका
..या ग्रामस्थांनी दारूबंदी साठी उचलले पाऊल

संपादक-नानासाहेब जवरे
कान्हेगाव-(प्रतिनिधी)
” सोनेवाडी परिसरात काही अवैध व्यावसायिकांना वारंवार सांगूनही त्यांनी ऐकले नाही.कोरोणा विषाणूच्या गंभीर संकटातही त्यांनी दारू विक्री चालू ठेवली तर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या पुढे सोनेवाडी परिसरात कुठल्याही अवैध व्यवसायांना थारा दिला जाणार नाही”-सरपंच गंगाराम खोमणे
सदरचे सविस्तर वृत्त असे की,रविवारी सकाळी दहा वाजता श्रावण भाऊराव भोजने यांच्या उसाच्या शेतात जपून ठेवलेले दोन-बँरल चारशे लिटर रसायन सोनेवाडी ग्रामस्थांनी पोलीस हवालदार अर्जुन बाबर यांच्या समवेत ओतून देत कारवाई केली. येथून पुढे सोनेवाडीत दारूबंदी होणार असा पवित्राच ग्रामस्थांनी घेतला आहे.सोनेवाडीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत,पोलीस पाटील व ग्रामस्थांनी संपूर्ण परिसर टाळेबंद केला मात्र स्थानिक प्रशासनाच्या सुचनेला न जुमानता सोनेवाडीतील अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी आपला प्रताप बंद केला नाही.सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे,पोलीस पाटील दगू गुडघे,बबलू जावळे,ग्रामपंचायत सदस्य चिलिया जावळे,भास्कर जावळे,बाळासाहेब जावळे,आण्णा गाढे,कर्णा जावळे, गोरक्षनाथ पोतकुले हे सदर अवैध दारूविक्रीच्या ठिकाणी गेले असता अवैध दारू विक्रेत्याने अरेरावीची भाषा करत लाकडी दांडा हातात घेत दादागिरी केली. सदरची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,उप पोलीस निरीक्षक श्री इंगळे यांना कळल्यानंतर त्यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतानाही अतिरिक्त फौजफाटा देत सदर दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पाठवले.
