जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ग्रामस्थांनी विनाकारण बाहेर पडू नका-यांचे आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातही कोरोना विषाणूंचा रुग्ण आढळून आल्याने गावातील ग्रामस्थांनी विनाकारण बाहेर पडून नको ती जोखिम पत्करून आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग जनतेला जागे करण्यासाठी आपले प्राण पणाला लावत असताना नागरिकांना याचे भान नसल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.सरकारने नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी किमान एक मिटरचे सामाजिक अंतर पाळावे हि तशी साधी बाब मात्र तेही काही बेजाबदर नागरिकांकडून पालन होत नाही.पर्यायाने अन्य नागरिकांच्या मृत्यूलाच हि मंडळी आमंत्रण देत आहे-विवेक परजणे

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ८ हजार ७३० इतकी झाली असून २९३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १३४ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ८९५ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतही याचा अनुभव येत असून ग्रामस्थांना वारंवार सूचना देऊनही अनेक बेजबाबदार ग्रामस्थ अद्याप ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाचे गांभीर्य समजून घ्यायला तयार नाही त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येऊ शकतेच पण ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येउ शकते याचे भान ठेवणे गरजेचे आहे.पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग जनतेला जागे करण्यासाठी आपले प्राण पणाला लावत असताना नागरिकांना याचे भान नसल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.सरकारने नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी किमान एक मिटरचे सामाजिक अंतर पाळावे हि तशी साधी बाब मात्र तेही काही बेजाबदर नागरिकांकडून पालन होत नाही.पर्यायाने अन्य नागरिकांच्या मृत्यूलाच हि मंडळी आमंत्रण देत आहे.ग्रामपंचायत आरोग्यासाठी सर्व जंतुनाशक फवारण्या करीत आहे.ग्रामस्थांच्या तपासण्या सुरु आहे.ग्रामस्थानी दुकान,भाजीपाला खरेदी साठी आगामी काळात टाळेबंदी उठल्यावरही सामाजिक अंतर पाळणे गरजेचे असल्याचेही उपसरपंच विवेक परजणे यांनी आवाहन शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close