कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात आपद्ग्रस्तांसाठी ४.७९ कोटींची नुकसान भरपाई
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात परातीच्या पावसाने झालेल्या कहरामुळे अनेक शेतकरी धशोधडीला लागले होते त्यां शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांसह आ.आशुतोष काळे यांनी लावून धरली होती तिला शासनाने हिरवा कंदील दाखवला असून तालुक्याला कोपरगाव विधानसभा मतदार संघातील आपदग्रस्तांना महाविकास आघाडी सरकारने ४.७९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली असून हि रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आ.काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात दौरा करून पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली होती.त्या बाबत नुकतीच राज्य सरकारने दहा हजार कोटींची घोषणा केली होती.त्यात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी ४.७९ कोटी रुपयांची मदत दिली आहे-आ.आशुतोष काळे
राज्यात यंदा पावसाने अनेक वर्षातील विक्रम मोडीत काढले आहे.त्यामुळे राज्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील राजकीय नेत्यांची झुंबड उडाली होती.पळे-पळे कोण पुढे तोचि स्पर्धा सुरु झाली होती.विरोधी पक्ष नेतेही त्यात मागे नव्हते.झालेल्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई मिळावी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,मदत व पुनर्वसनमंत्री ना.विजय वडेट्टीवार तसेच कृषीमंत्री ना.दादा भुसे हेही त्यात मागे नव्हते.त्यावर श्रेयाच्या व बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.आ.काळे यांनीही कोपरगाव तालुक्यात दौरा करून पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राज सरकारकडे केली होती. त्या बाबत नुकतीच राज्य सरकारने दहा हजार कोटींची घोषणा केली होती.त्यात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी ४.७९ कोटी रुपयांची मदत दिली आहे.यामध्ये पूर,चक्रीवादळ १.०० कोटी,अतिवृष्टी व पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाच्या नुकसानीपोटी पशुधन खरेदीसाठी ०.३० कोटी, चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे घरांच्या झालेल्या नुकसानीपोटी घरांची दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी ८.८८ कोटी, शेतातील एस.डी.आर.एफ.च्या दराने बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी ३०९.८४ कोटी व वाढीव दराने शेती पिकांसाठी १४६.६२ कोटी असे एकूण ४.७९ कोटी रुपयांची मदत दिली आहे. यापूर्वी देखील मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टींच्या नुकसानीपोटी मतदार संघातील शेतकरी व नागरिकांना ३.८८ कोटींची मदत महाविकास आघाडी सरकारने देऊन एकूण जवळपास ९ कोटीपर्यंत नुकसान भरपाई दिली आहे. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून मतदार संघातील जनतेच्या वतीने समाधान व्यक्त केले आहे.