जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

तळेगाव मार्गे संगमनेर रस्त्याची दुरुस्ती करा-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर भारतीय अवजड व प्रवासी वाहनांना पुणे महानगरीसाठी सर्वात जवळचा ठरणारा तळेगाव दिघे मार्गे कोपरगाव-संगमनेर या मार्गाची वर्तमान काळात पार वाट लागली असून वाहनांना व त्यातील प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.अनेक प्रवाशांची जीवित व वित्तीय हानी होत असून या मार्गाची त्वरित दुरुस्ती केली नाही तर आपण उपोषण करू असा इशारा अड्.योगेश खालकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कोपरगाव कार्यालयाला दिला आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने या विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांचेशी संपर्क साधला असता तो स्थापित होऊ शकला नाही तथापि आपल्या मागणीला प्रतिसाद देत अधिकाऱ्यानी या मार्गाचे काम हाती घेतले असून त्याचे खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला असल्याचे अड्.योगेश खालकर यांनी सांगितले असून समाधान व्यक्त केले आहे.

उत्तर भारतीय वाहनांना पुणे,कोल्हापूर,सांगली,सातारा आदी शहरांसाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून पुणतांबा फाट्यावरून पुढे झगडे फाटा,पोहेगाव,जवळके तळेगाव दिघे,वडगाव पान मार्गे संगमनेर व पुढे आळे फाटा व नारायणगाव आदी शहरावरून हा मार्ग पुढे पुण्याला जाण्यास सर्वात जवळचा ठरतो.संगमनेर येथे तो राष्ट्रीय महामार्गाला लागतो.या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते.शिवाय पुण्याहून शिर्डीला येण्यासाठी हा मार्ग सर्वात जवळचा आहे.त्यामुळे प्रवासी व अवजड वाहतुकीचा या मार्गावरून कायम राबता असतो.व अवजड वाहने हि चाळीस ते पन्नास टनापेक्षा जास्त बोजा घेऊन या मार्गाने वाहतूक करतात.त्या प्रमाणात मात्र या रस्त्याची मजबुती केलेली दिसत नाही.या मार्गासाठी झगडे फाटा ते वडगाव पान या साठी जवळपास साठ कोटी रुपयांची मोठी तरतूद झाल्याची घोषणा झाली आहे.मात्र अद्याप त्याचे घोडे नेमके कुठे अडले हे समजण्यास मार्ग नाही.मात्र तूर्त तरी या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवणे गरजेचे आहे.त्या साठी अड्.खालकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांना नुकतेच निवेदन देऊन मागणी केली आहे.व आठ दिवसात काम सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close