गुन्हे विषयक
शेती वाटपाच्या कारणावरून गज-काठीने मारहाण
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेजवळ रहात असलेल्या दिलीप दिनकर निकम,मोतीराम दिनकर निकम, भूषण दिलीप निकम,सर्व रा.सुरेगाव शिवार यांनी आपल्याला व आपल्या पतीला शेतजमीन वाटप करण्यावरून गज-कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचा गुन्हा फिर्यादी महिला शालिनी रमेश निकम यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेचा पती व अन्य आरोपी हे भाऊ-भाऊ आहे.मात्र त्यांचे वाटपावरून झालेले वाद आपापसात मिटले नाही त्याचे पर्यवसान थेट काल दुपारी ४.३० वाजता भांडणात होईन ते इतके विकोपाला गेले की आरोपी दिलीप दिनकर निकम,मोतीराम दिनकर निकम,भूषण दिलीप निकम यांनी फिर्यादी महिला शालिनी निकम व तिचे पती रमेश निकम यांना शिवीगाळ करत गजाने व काठीने आणि कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी महिला व तिचा पती रमेश निकम हे राहतात.त्यांचे जमिनींचे वाटप करण्यावरून आपापसात वाद आहेत.या वादाचे रूपांतर नुकतेच भांडणात झाले व फिर्यादी महिलेचे सासरे दिनकर बच्चन निकम यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीचे वाटप अद्याप बाकी आहे.फिर्यादी महिलेचा पती व अन्य आरोपी हे भाऊ-भाऊ आहे.मात्र त्यांचे वाटपावरून झालेले वाद आपापसात मिटले नाही त्याचे पर्यवसान थेट काल दुपारी ४.३० वाजता भांडणात होईन ते इतके विकोपाला गेले की आरोपी दिलीप दिनकर निकम,मोतीराम दिनकर निकम,भूषण दिलीप निकम यांनी फिर्यादी महिला शालिनी निकम व तिचे पती रमेश निकम यांना शिवीगाळ करत गजाने व काठीने आणि कुऱ्हाडीने मारहाण करून पाठीत,हाताचे बोटावर मारून फिर्यादी महिला शालिनी निकम व रमेश निकम या पती-पत्नीस जबर मारहाण करून फिर्यादी महिलेचा डावा हात गंभीर दुखापत करून त्यास तडा दिला आहे.व जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे सुरेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५१८/२०२० भा.द.वि.कायदा कलम ३२६,३२४,३२३,५,०४,५०६,३४ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.अशोक गवसने हे करीत आहेत.