जाहिरात-9423439946
धार्मिक

साई पुण्यतिथी निमित्त भिक्षा झोळी कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०२ वा श्रीं च्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेला प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.

भिक्षा झोळीकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून दान भिक्षा स्विकारण्‍याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४, पिंपळवाडी रोड गेट नंबर ०२, चावडी समोर, नाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.सकाळी १०.०० वाजता मंदिर पुजारी उल्‍हास वाळुंजकर यांचा कीर्तन कार्यक्रम झाला.

उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली आहे. पारायण समाप्‍ती नंतर श्री साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली.या मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी वीणा,उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पोथी आणि मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्र.कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला आहे.

सकाळी ०६.०० वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.संगिता बगाटे यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात पाद्यपुजा व आराधना विधी करण्‍यात आली.सकाळी ०९.०० वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलणे व समाधी मंदिरात काढण्‍यात आलेल्‍या प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्र.कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर,मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदि उपस्थित होते.

दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली.सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन करण्‍यात आले.सायंकाळी ०६.०० वाजता श्रीं ची धुपारती झाली. तर रात्रौ १०.३० वाजता शेजारती झाली.
यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने कोईमतूर येथील दानशूर साईभक्त श्री.नाकाराजा यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व शनि शिंगणापूर येथील शनेश्‍वर लाईट डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई केली.उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ०५.२० वाजता श्रीं चे मंगल स्‍नान,सकाळी ०६.०० वाजता श्रीं ची पाद्यपूजा, सकाळी ०६.३० वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल.सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता श्रीं ची माध्‍यान्‍ह आरती, सायंकाळी ०६.०० वाजता श्रीं ची धुपारती होऊन रात्रौ १०.३० वाजता शेजारती होणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close