विशेष दिन
…या विदयालयांत ‘दिव्यांग दिन’ संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
‘जागतिक दिव्यांग दिवस’ हा दिव्यांग व्यक्तींवरील सामाजिक,सांस्कृतिक आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा दिवस असून तो कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

“दिव्यांग व्यक्तींना शारीरिक किंवा मानसिक अडचणी येत असतात,परंतु त्यांच्यात अपार क्षमता,गुण,आणि कार्यक्षमता देखील असतात.समाजाने या व्यक्तींना समान संधी आणि समर्थन देणे अत्यंत आवश्यक आहे”-रमेश गायकवाड,मुख्याध्यापक,श्रीमान गोकुळचंद विद्यालय,कोपरगाव.
जागतिक दिव्यांग व्यक्ती दिन दरवर्षी ०३ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.हा दिवस दिव्यांग व्यक्तींवरील सामाजिक,सांस्कृतिक आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.१९९२ साली संयुक्त राष्ट्र संघाने या दिवसाची सुरुवात केली होती.या दिवसाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांची आणि गरजांची पूर्तता करण्यासाठी समाजात जागरुकता निर्माण करणे आहे.कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
या कार्यक्रमाला दीलीप कुडके,निलेश बडजाते,पंकज जगताप,योगेश गवळे आदी शिक्षक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्रास्तविक करताना मुख्याध्यापक रमेश गायकवाड म्हणाले की,”आजच्या दिवशी विविध प्रकारच्या दिव्यांगतेच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये दिव्यांग व्यक्तींचे योगदान आणि सामर्थ्य प्रदर्शित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा ठरतो.दिव्यांग व्यक्तींना शारीरिक किंवा मानसिक अडचणी येत असतात,परंतु त्यांच्यात अपार क्षमता,गुण,आणि कार्यक्षमता देखील असतात.समाजाने या व्यक्तींना समान संधी आणि समर्थन देणे अत्यंत आवश्यक असल्याचे शेवटी म्हंटले आहे.जेष्ठ शिक्षिका अंजली गायकवाड यांनी दिव्यांगाचे महत्त्व सांगताना स्टिफन हाॅकींग,हेलन केलर यांचा जीवन परीचय स्पष्ट केला आहे.
सदर प्रसंगी विदयालयांचे उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे व जेष्ठ शिक्षिका राजश्री बोरावके यांचे हस्ते दिव्यांग विद्यार्थीना गुलाब पुष्प देवुन सन्मान करण्यात आला.जेष्ठ शिक्षक अनिल अमृतकर यांनी स्वागत केले आहे.या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन जेष्ठ शिक्षक बलभीम उल्हारे यांनी तर आभार अतुल कोताडे यांनी मानले आहे.