कोपरगाव तालुका
कोपरगावात वैजापूर रस्त्यावर भाजप प्रचाराची रिक्षा पल्टी,जीवित हानी नाही,उलट-सुलट चर्चेला उधाण!
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहराच्या ईशान्येस साधारण दोन कि.मी.अंतरावर वडांगळे वस्तीजवळ पशु पैदास केंद्रालगत बिरोबा मंदिराच्या दक्षिण बाजूस सत्ताधारी भाजपची प्रचाराची रिक्षा मंगळवार दि आठ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रतापामुळे पल्टी झाली आहे.(तसे तालुक्यातील सर्वच रस्ते याच आणि यापेक्षा जास्त खराब असल्याने अपघात तालुका आणि शहर याना आता नवे राहिलेले नाही.) मात्र सुदैवाने त्या घटनेत चालकासह अन्य कोणीही जखमी झाले नाही.तथापि हि घटना ज्या प्रत्यक्षदर्शींनी पाहिली त्यांच्यात लागलीच उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
कुठल्याही शुभ कार्यात मांजर,मुंगूस,गाय, कुत्रा,कावळा,गाढव,यांच्या आडव्या येण्याजाण्याने आम्ही कार्य होणार कि नाही हे शोधणारी आमची जमात त्यातील आमची उपस्थित माणसे यातून काही अर्थ-अनर्थाच्या, यश-पराजय आदी गोष्टी शोधू लागल्या असतील तर त्यात आमचा दोष धरू नका म्हणजे झाले.
या घटनेची माहिती कोपरगाव शहर आणि तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व मदतीसाठी पक्षाचे कार्यकर्ते लागलीच ईशान्य गडावरून धावून आले,मात्र सदर अपघातग्रस्त वाहनाचे सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची झुंबड पाहिल्यावर त्यास भाजपच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हरकत घेऊन छायाचित्र काढण्यास प्रतिबंध केला. तथापि जो प्रताप सेल्फी वाल्यानी करायला नको तो केलाच ! त्यामुळे हे वृत्त वाऱ्यासारंखे पसरण्यास वेळ लागला नाही.त्याचे शहर व तालुक्यात उलटसुलट चर्वितचर्वण सुरु होण्यास वेळ लागला नाही.आता ती चर्चा काय झाली असेल हे आमच्या कडून वदवून घेऊ नका म्हणजे कमवली !
दुसऱ्या एका घटनेत फुलंब्री मतदार संघात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रचाराची गाडी काही कारणामुळे बंद पडल्याने शालेय विद्यार्थ्यांना तिला धक्का देण्याचा अनास्था प्रसंग गुदरला असल्याचा प्रसंग सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित झाला आहे.
कुठल्याही शुभ कार्यात मांजर,मुंगूस,गाय, कुत्रा,कावळा,गाढव,यांच्या आडव्या येण्याजाण्याने आम्ही कार्य होणार कि नाही हे शोधणारी आमची जमात त्यातील आमची उपस्थित माणसे यातून काही अर्थ-अनर्थाच्या, यश-पराजय आदी गोष्टी शोधू लागल्या असतील तर त्यात आमचा दोष धरू नका म्हणजे झाले. शुभ-अशुभ संकेत पाळणाऱ्या आमच्या समाजात या घटना काय असतील ते आम्ही सांगण्याची गरज नाही.