जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात रुग्ण वाढ थंडावली

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत १६ रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून कोपरगाव तालुक्यातील एक रुग्णांचे निधन झाले असून कोपरगाव तालुक्यात एकूण ७३ अँटीजन रॅपिड टेक्स्ट करण्यात आली असून त्यात १८ रुग्ण बाधित निघाल्याने रुग्णांची संख्या काल अखेर ८४३ इतकी झाली आहे.तर ५५ जण निरंक निघाल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यात १२६ रुग्ण सक्रिय रुग्ण असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०६ हजार ९९३ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३४ लाख ४६ हजार ७०५ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ६३ हजार ६९० वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ लाख ६४ हजार २८१ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २४ हजार १०३ वर जाऊन पोहचला आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १९ हजार ६६१ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २८२ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.आज आलेल्या यादीत शहरात १४ तर ग्रामीण भागात ०४ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र ताळेबंदीत आता रुग्ण वाढीत आळा बसला असल्याचे दिसत असून आगामी काळात ते चित्र अधिक स्पष्ट होईल असे दिसत आहे.

आज आढळलेल्या बाधित रुग्णांत

सुभाषनगर दोन पुरुष (वय-४०,८०),एक महिला (वय-२८),

बस स्थानकासमोर एक महिला (वय-३७),

नवले वस्ती महिला (वय-४९),

इंदिरापथ पाच रुग्ण त्यात तीन पुरुष (वय-७५,४९,४८),दोन महिला (वय-६६,४३),

निवारा परिसर पुरुष (वय-४८),

टिळकनगर एक बालक (वय-०९),

गांधीनगर एक पुरुष (वय-६५)

पांडेगल्ली येथील एक महिला (वय-२१)

असे अठरा जण बाधित रुग्ण आढळले आहे.तर ग्रामीण भागात,मुर्शतपूर एक पुरुष (वय-४५),टाकळी येथे एक पुरुष (वय-३९) तर पढेगाव येथे एक पुरुष (वय-५२) धारणगाव येथील बालक (वय-११)आदी अठरा रुग्णांचा समावेश असून ते कोरोना बाधित आढळले आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ८२० इतकी झाली आहे.त्यात १२६ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १६ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.९३ टक्के आहे.आतापर्यंत ०४ हजार ०७९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १६ हजार ३१६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १९.७३ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ६७८ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८२.६८ टक्के झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close