कोपरगाव तालुका
कोळपेवाडीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार शिवाजी कोळपे याने अंतिम वर्षात शिक्षण घेत कोळपेवाडी प्रत्यक्ष शेतात जाऊन त्या परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक व जैविक बीज उपचारा संबंधी आधुनिक शेती विषयक मार्गदर्शन केले आहे.
या प्रसंगी कृषी दूत तुषार कोळपे यांनी आधुनिक शेती विषयीचे फायदे व पिकावर होणारा किडीचा प्रादुर्भाव असेच रोग प्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी,गांडुळशेती,फळप्रक्रिया,दुग्धजन्य पदार्थ निर्मिती या बाबत मार्गदर्शन केले आहे.फवारणी पंप हाताळणी,जैविक,अजैविक रसायने आदी बाबत मार्गदर्शन केले आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. पी.कुळधर,प्रा.डॉ.एस.डी.म्हस्के,प्रा.आर.एस.नरोटे, प्रा.एस.ए.तायडे,प्रा.जे.एस.राठोड,प्रा.ए. आर.कोळगे, प्रा.एस.बी.पगारे,प्रा.भोर मॅडम,प्रा.एस.एस.शेवंगावकर आदींचे मार्गदर्शन लाभले होते.