कोपरगाव तालुका
गुणवंतांचा गौरव ऊर्जा देणारा ठरणार-रविंद्र आगवण

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यात सर्वप्रथम करंजी ग्रामपंचायतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करुन त्यांच्या चांगल्या कार्याची दाखल घेतली असल्याने त्यांना हि ऊर्जा नक्कीच भविष्यात उपयोगी पडेल असे प्रतिपादन करंजी ग्रामपंचायतचे उपसरपंच रविंद्र आगवण यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
विद्यालयात सर्व प्रथम आलेले साक्षी अण्णासाहेब कापसे ९१.६० टक्के,रीतेश भाऊसाहेब आगवन ९१.६० टक्के व्दितीय क्रमांक साक्षी दत्तात्रय भिंगारे ९०.६० टक्के तृतीय क्रमांक आश्र्विनी अनिल चरमळ ८९.२० टक्के तसेच १२ वी मध्ये लातूर विद्यालय येथील अक्षदा बाळासाहेब ढवळे,तेजश्री अरुण भींगारे,तसेच १२ वी विज्ञान श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयामधुन हृतीका सोमनाथ जाधव,गणेश मच्छिंद्र आगवण,तेजस कृष्णा शहाणे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोपरगाव तालुक्याच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा वृक्ष व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी कोल्हे कारखान्याचे संचालक भास्कर भिंगारे उपसभापती नवनाथ आगवन,सरपंच छबु आहेर,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गुंड, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ फापाळे,अनिल डोखे,बाळासाहेब भिंगारे,गणेश भिंगारे,लक्ष्मण शेळके,आप्पासाहेब आगवान,भाऊसाहेब शहाणे,गोरख भिंगारे,संतोष काजळे,बाबासाहेब कापसे,संजय उगले,रघुनाथ भिंगारे,राजेंद्र चरमळ,संजय फापाळे,योगेश शिंदे,देविदास भिंगारे,बळीराम थेटे,अनिल चरमळ,रमेश फापाळे यांसह ग्रामस्थ सामाजिक अंतर ठेवून उपस्थीत होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आगवन कोल्हे कारखान्याचे संचालक भास्कर भिंगारे,संतोष काजळे,अनिल डोखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.